ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना पार पडणार होता. परंतु भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारतीय खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे बीसीसीआय आणि ईसीबीने मिळून हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. हा सामना पुन्हा खेळवला जाणार की नाही? याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नाहीये. दरम्यान ईसीबीने इंग्लंडच्या खेळाडूंना काही आदेश दिले आहेत, ज्यामुळे आयपीएल फ्रँचायजींना मोठा धक्का बसू शकतो.
आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूंनी काही ना काही कारण देत स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता अशी बातमी समोर येत आहे की, उर्वरित १० खेळाडूंपैकी ९ खेळाडू आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफ सामन्यांसाठी उपलब्ध नसतील.
क्रिकबजच्या वृत्तानुसार, इंग्लंड संघाला १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध २ टी-२० सामने खेळायचे आहेत. त्यामुळे खेळाडूंना ९ ऑक्टोबरपर्यंत देशात परतावे लागणार आहे. ईसीबीने खेळाडूंना आदेश दिले आहेत की, याबाबतीत खेळाडूंना कुठलीही सूट दिली जाणार नाही. त्यामुळे आयपीएल स्पर्धा खेळत असणाऱ्या १० पैकी ९ खेळाडूंना आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफ सामन्यांतून माघार घ्यावी लागणार आहे.
फक्त रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करत असलेला जॉर्ज गार्टन संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध असेल. या स्पर्धेतील प्लेऑफचे सामने १० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. तर अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. (England T20 World Cup squad will likely not be available to play knock out Stages of ipl)
असे झाले तर चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसू शकतो. कारण सॅम करन आणि मोईन अली या दोघांनाही या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागेल. तर दिल्ली कॅपिटल्स संघाचा टॉम करन आणि राजस्थान रॉयल्स संघातील लियाम लिविंस्टोनला स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार ओएन मॉर्गनला देखील स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हाच कर्णधार हवा! नेतृत्व करताना रोहितची अफलातून आकडेवारी, वाचा सविस्तर
कडक षटकारासह शतक केल्यानंतर फलंदाजाचे ‘फेकाफेकी सेलिब्रेशन’, आयुष्यात असं कधी पाहिलं नसेल!
युएई टप्प्यात ‘हे’ समालोचक आयपीएल सामन्यांमध्ये आणणार आणखी रंगत, भारतीय दिग्गजांची भरमार