---Advertisement---

वोक्सच्या जागी DC मध्ये ‘या’ गोलंदाजाची निवड, टी२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्सची केलीय कामगिरी

On: सोमवार, सप्टेंबर 13, 2021 2:21 PM
---Advertisement---

येत्या १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहेत. दरम्यान युएईला रवाना होण्यापूर्वी काही इंग्लिश खेळाडूंनी वैयक्तिक कारणास्तव आयपीएल स्पर्धा खेळण्यास नकार दिला आहे. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सचाही समावेश आहे. आता त्याच्याऐवजी दिल्ली कॅपिटल्स संघात एका धाकड गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे.

इंग्लंड संघातील खेळाडू ख्रिस वोक्स, जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड मलान यांनी आयपीएल स्पर्धा खेळण्यास नकार दिला आहे. शेवटच्या क्षणी घेतलेल्या या निर्णयामुळे आयपीएल फ्रेंचायजिंना मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाज बेन द्वारशुइसला संधी दिली आहे.

बेन द्वारशुइस या २७ वर्षीय गोलंदाजाला अजुनपर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा अनुभव नाहीये. परंतु देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याच्या वेगवान गोलंदाजीने तो ख्रिस वोक्सची कमतरता भरून काढू शकतो. त्याने आतापर्यंत ७ लिस्ट ए सामन्यात १२ आणि ८२ टी-२० सामन्यात १०० गडी बाद केले आहेत. (Ben dwarshuis replaces Chris woakes in delhi capitals for ipl 2021 uae leg)

बेन द्वारशुइस हा गोलंदाजीसह फलंदाजी देखील करू शकतो. परंतु हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, दिल्ली कॅपिटल्स संघाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये त्याला संधी मिळते का? यापूर्वी बेन द्वारशुइसने पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु त्याला आयपीएल स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती.

आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कडक बायो बबल असताना देखील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. ज्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल कमिटीने मिळून ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

युएई टप्पा चाहत्यांसाठी ठरणार पर्वणी, प्लेऑफ गाठण्यासाठी ‘हे’ संघ लावणार पूर्ण जोर; पाहा सद्यस्थिती

इंग्लंड क्रिकेट बोर्डाची ‘गुगली’, सर्व इंग्लिश खेळाडूंना आयपीएलमधून माघार घेण्यास पाडले भाग!

कडक षटकारासह शतक केल्यानंतर फलंदाजाचे ‘फेकाफेकी सेलिब्रेशन’, आयुष्यात असं कधी पाहिलं नसेल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---