मुंबई । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी देशांतर्गत क्रिकेटच्या रचनेत प्रचंड बदल केले आहेत. मानक प्रणाली प्रक्रियेनुसार (एसओपी), देशांतर्गत क्रिकेटशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामुळे घरगुती क्रिकेट बळकट होईल. परंतु वयाच्या 60व्या वर्षे पार झालेल्या अनेक दिग्गजांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
राज्य संघटनांना बीसीसीआयने जारी केलेल्या एसओपीमुळे 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना प्रशिक्षण शिबिरात भाग घेता येणार नाही. ज्याचा परिणाम अनुक्रमे बंगाल आणि बडोदा येथील संघाचे प्रशिक्षक अरुण लाल आणि ऑस्ट्रेलियन डेव्ह व्हॉटमोरवर होऊ शकतो.
बडोद्याच्या संघाने एप्रिलमध्ये 66 वर्षाच्या व्हॉटमोर यांना संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते, तर 65 वर्षीय अरुण लाल यांच्या मार्गदर्शनाखाली बंगालने मार्चमध्ये रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
बीसीसीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, “कोविड-19 मध्ये 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक, पंच, क्षेत्ररक्षक आणि मधुमेहासारख्या आजारांवर उपचार घेत असलेल्या लोकांना, रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या लोकांना जास्त धोका आहे. जोपर्यंत सरकार योग्य मार्गदर्शक सूचना जारी करत नाही, तोपर्यंत अशा व्यक्तींना प्रशिक्षणाच्या कार्यात भाग घेता येणार नाही.”
अरुण लाल आणि व्हॉटमोर हे दोघेही प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार नाहीत. यासंदर्भात बंगाल क्रिकेट असोसिएशनचे (सीएबी) अध्यक्ष अविषेक दालमिया यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकार्याच्या म्हणण्यानुसार, “कोणत्याही संघाला नियमांचे उल्लंघन करणे फार कठीण जाईल. अरुण लाल, डेव्ह व्हॉटमोरसारख्या प्रशिक्षकाला बाहेर रहावे लागेल हे फार दुर्दैवी आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
-माजी क्रिकेटर राहुल द्रविड पुन्हा आला टीम इंडियाच्या मदतीला, आता सांभाळणार ही जबाबदारी
-धोनीच्या कोरोना चाचणीबद्दल आले मोठे वृत्त, सीएकेच्या अधिकाऱ्याने दिली माहिती
-हा क्रिकेटर तर चुकून झाला राष्ट्रीय संघाचा कोच, नाहीतर मोहम्मद युसूफच होता लायक
ट्रेंडिंग लेख-
-आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या…
-वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप ५ फलंदाज….
-एकाच वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे ५ भारतीय खेळाडू…






