नवी दिल्ली। भारत सरकारने आयपीएल २०२० च्या आयोजनासाठी परवानगी दिल्यानंतर आता सर्व आयपीएल फ्रंचायझी संघ यूएईच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी सज्ज झाले आहेत. १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलपूर्वी सर्व फ्रंचायझी संघांची आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलसोबत बैठक होणार आहे, ज्यामध्ये अनेक मोठ्या मुद्द्यांवर विशेषत: मानक संचालन प्रक्रियेवर निर्णय घेतला जाईल. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी इतर कोणती नसून सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी आणि त्याच्या संघाच्या कोरोना चाचणीबाबत आहे.
माध्यमांतील काही वृत्तांनुसार सीएसकेच्या (Chennai Super Kings) एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, संघाचा कर्णधार धोनी (MS Dhoni) आणि इतर खेळाडूंची कोरोना चाचणी केव्हा आणि कुठे केली जाणार आहे.
धोनीच्या कोरोना चाचणीबाबत मोठी बातमी
माध्यमांतील काही वृत्तांनुसार सीएसकेच्या एका अधिकाऱ्याला जेव्हा विचारले की, खेळाडू कसे येतील आणि कशाप्रकारे त्यांची कोरोना चाचणी केली जाईल?, यावर प्रत्युत्तर देत अधिकाऱ्याने माहिती दिली की, सुरुवातीला खेळाडू कोरोना चाचणी करतील आणि त्यानंतरच चेन्नईमध्ये येतील. त्याच्या ४८ तासांच्या आत संपूर्ण संघ यूएई साठी रवाना होईल.
माध्यमांतील ताज्या वृत्तांनुसार, कोणताही आयपीएल फ्रंचायझी संघ २० ऑगस्टपूर्वी यूएईला जाऊ शकत नाही. अशामध्ये म्हटले जाते आहे की, सीएसकेच्या खेळाडूंची कोरोना चाचणी १८ किंवा १९ ऑगस्ट रोजी होऊ शकते. सीएसकेच्या अधिकाऱ्याने हेदेखील सांगितले की, सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतरच संघाच्या खेळाडूंची विसा प्रक्रिया सुरू केली जाईल. माध्यमांतील काही वृत्तांनुसार, सीएसकेचे अधिकारी आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलशी सातत्याने संपर्क साधत आहेत तसेच गुरुवारपर्यंत स्पर्धेचे मानक संचालन प्रक्रिया रिलीझ केली जाऊ शकते.
सीएसके संघ यूएईमध्ये सर्वप्रथम पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. सीएसके संघाला यूएईला लवकरात लवकर जायचे होते. परंतु बीसीसीआयने २० ऑगस्टपर्यंत कोणत्याही संघाला यूएईला न जाण्याचे आदेश दिले आहेत.
भारतात नाही होणार सीएसकेचे कोणतेही शिबिर?
माध्यमांमध्ये असे वृत्त येत होते की, सीएसके संघाचे भारतातच शिबिर होऊ शकते. परंतु आता असे होणे कठीण दिसत आहे. संघाची लवकरात लवकर यूएईला पोहोचण्याची रणनीती आहे. सीएसके संघात धोनी, हरभजन सिंग, सुरेश रैना, अंबाती रायडू यांसारखे खेळाडू आहेत, ज्यांनी बरेच दिवस झाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही. ते आयपीएलमध्ये खेळताना दिसतात. त्यामुळे सीएसके संघाला सर्वप्रथम आपल्या संघाचे शिबिर आयोजित करायचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-हा क्रिकेटर तर चुकून झाला राष्ट्रीय संघाचा कोच, नाहीतर मोहम्मद युसूफच होता लायक
-कोरोनाने घेतले सोलापूरच्या क्रिकेटरचे प्राण, गेल्या २ आठवड्यांपासून चालू होते उपचार
-‘धोनीपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही’ इंग्लंडच्या खेळाडूने केली धोनीची प्रशंसा…
ट्रेंडिंग लेख-
-आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या…
-वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप ५ फलंदाज….
-एकाच वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे ५ भारतीय खेळाडू…