जवळपास गेल्या ४ महिन्यांपासून कोरोना व्हायरसने पिडीत लोकांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. या महामारीने काही क्रिकेटपटूंचा देखील जीव घेतला आहे. काल (२ ऑगस्ट) एका माजी रणजीपटूचा कोरोना संक्रमनामुळे मृत्यू झाला आहे. उमेश दास्ताने असे त्यांचे नाव आहे. ६३ वर्षीय उमेश यांचा रविवारी रात्री २ वाजता मृत्यू झाला. गेल्या २ आठवड्यांपासून महाराष्ट्रातील सोलापूरच्या एका दवाखान्यात त्यांच्यावर उपचार चालू होते. Former Ranji Player Umesh Dastane Die Due To Covid-19
६३ वर्षीय उमेश यांनी रेल्वे संघाकडून १६ रणजी ट्रॉफी सामने खेळले आहेत. तसेच, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर एका शतकाची देखील नोंद आहे. त्यांनी प्रथम श्रेणीत ७४७ धावा आणि १३ विकेट्स घेतल्या आहेत.
गेल्या काही दिवसांत पुढे आलेल्या ५४,७३५ नव्या पिडीतांनंतर देशातील कोरोना बाधितांची संख्या १७ लाखांवर पोहोचली आहे. तर, काल अजून ८५३ लोकांनी कोरोना व्हायरसमुळे आपला जीव गमावल्यामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या ३७,३६४ इतकी झाली आहे. तसेच, बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या ११ लाखांपेक्षा जास्त आहे. तर, ५,६७,७३० लोकांवर उपचार चालू आहेत.
माहितीनुसार कोव्हिड-१९मुळे स्वस्थ होणाऱ्यांचा दर ६५.४४ टक्के इतका झाला आहे. तर, मृत्यूदर कमी होऊन २.१३वर आला आहे. हा सलग चौथा दिवस आहे, ज्यामध्ये देशात ५०,०००पेक्षा जास्त कोव्हिड-१९ प्रकरणे पुढे आली आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार १ ऑगस्टपर्यंत एकूण १,९८,२१,८३१ नमुन्यांची तपासणी केली गेली आहे.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात हे ५ दिग्गज विदेशी खेळाडू दिसणार नाहीत, संघांचे टेन्शन वाढले
हे ५ खेळाडू जिंकू शकतात आयपीएल २०२० ‘मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर’ चा पुरस्कार
४ असे वनडे सामने, जे टीम इंडियाने जिंकले केवळ १ धावेने
महत्त्वाच्या बातम्या –
अनेक दिग्गजांनाही न जमलेला असा खास पराक्रम करणारा वीरेंद्र सेहवाग एकमेव भारतीय क्रिकेटपटू
रैनाने म्हटले रोहितच पुढचा धोनी, तर रोहितने दिले ‘हटके’ प्रत्युत्तर
लॉकडाऊनमध्ये कोणाबरोबर रहायला आवडेल?, ‘या’ खेळाडूने घेतले धोनीचे नाव…