गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाचे सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने धुळीस मिळवले. चेन्नईने अंतिम सामन्यात सोमवारी (29 मे) डावाच्या अखेरच्या चेंडूवर रोमांचक विजय मिळवत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावली. मात्र, हा सामना अत्यंत निर्णायक वळणावर आलेला असताना, स्टेडियममध्ये उपस्थित असलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी केलेल्या एका कृतीमुळे चाहते चांगलेच संतापले आहेत.
हा अंतिम सामना पाहण्यासाठी बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी अहमदाबाद येथे हजर होते. कोणतेही पदाधिकारी एका विशिष्ट संघाला यावेळी पाठिंबा देऊ शकत नाहीत. मात्र, शेवटच्या षटकात सामना रंगतदार अवस्थेत पोहोचलेला असताना शहा हे गुजरात संघाला पाठिंबा देत असल्याचे दिसले. गुजरातचा गोलंदाज मोहित शर्मा याने अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर केवळ एक धाव दिली. त्यामुळे समीकरण 4 चेंडू 12 धावा असे आले होते. त्यावेळी शहा यांनी एक अत्यंत लाजिरवाणी कृती केली. ते कृत्य कॅमेरात कैद झाल्याने आता सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केले जात आहे.
Ladies and Gentleman: Introducing Jay Shah
1) The son of the Home Minister of India
2) Honorary Secretary of BCCI
3) President- Asian Cricket CouncilIf this is the gesture of such a guy, Sakshi Malik and Vinesh Phogat should not expect anything further.
SHAME SHAME SHAME. pic.twitter.com/ObPC1OE0Uh
— Adv.Soumyadipta Roy (@soumodiptoroyy) May 29, 2023
एका ट्विटर वापरकर्त्याने लिहीले, भारताच्या गृहमंत्र्यांचा मुलगा, बीसीसीआय सचिव, आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा पाहा कसे करतात. अशा लोकांकडून साक्षी मलिक व विनेश फोगट यांनी न्यायाची अपेक्षा करू नये. ही शरमेची बाब आहे.’
शहा यांचा मागील काही काळापासून भारतीय क्रिकेट क्षेत्रात मोठा दबदबा दिसून येतो. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचे ते पुत्र आहेत. बीसीसीआय सचिव पदासह क्रिकेट परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. आगामी काळात ते आयसीसी अध्यक्ष देखील होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते.
(BCCI Secretary Jay Shah Bad Gesture In IPL 2023 Final Netizens Troll Badly)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्राचे ‘6’ मावळे ज्यांनी गाजवलाय आयपीएलचा सोळावा हंगाम, चौघांनी तर ट्रॉफीच जिंकलीये
नाचू किती…! ढोल वाजू लागताच दीपक चाहरने सुरु केला भांगडा, बेभान होऊन नाचला; बायकोनेही दिली साथ