जय शाह 2019 पासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव आहेत. सध्या बीसीसीआयची चावी त्यांची हाती आहे. मात्र आता जय शाह आणखी जास्त ताकदवान बनू शकतात.
वास्तविक, जय शाह आता आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे अध्यक्ष बनू शकतात. ‘क्रिकबझ’च्या रिपोर्टनुसार, जर जय शाह यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केला, तर त्यांची बिनविरोध निवड होऊ शकते. परंतु जय शाह यांनी या संदर्भात अद्याप कोणताही स्पष्ट निर्णय घेतला नसल्याचं वृत्त आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. सध्या न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले या संस्थेचं अध्यक्षपद भूषवत असून आणि ते दुसऱ्या टर्मसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
‘क्रिकबझ’नुसार, आयसीसी जुलै महिन्यात कोलंबोमध्ये एक बैठक घेणार आहे, ज्यामध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली जाऊ शकते. जय शाह अद्याप या विषयावर काही बोलले नसले तरी ते आयसीसीच्या काही पद्धतींवर खूश नसल्याचं वृत्त आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये टी20 विश्वचषक आयोजित करण्याबद्दल ते नाखूश होते. जर शहा यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज केला आणि निवडणूक जिंकली, तर ते आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनतील.
अहवालानुसार, आयसीसी अध्यक्षांच्या कार्यकाळात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी एखादी व्यक्ती तीन वेळा अध्यक्ष होऊ शकत होती आणि प्रत्येक कार्यकाळ 2 वर्षांसाठी होता. परंतु नवीन नियमांनुसार, एखादी व्यक्ती दोनदा अध्यक्ष होऊ शकते आणि प्रत्येक कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. जय शाह अध्यक्ष झाले, तर ते या पदावर 3 वर्ष राहतील आणि असं केल्यावर ते 2028 मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष होण्यास पात्र ठरतील.
जय शाह यांनी 2009 मध्ये क्रिकेट प्रशासनात एंट्री घेतली होती. त्याआधी ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पद सांभाळत होते. ते 2015 मध्ये बीसीसीआय मध्ये सामील झाले आणि सप्टेंबर 2019 मध्ये बोर्डाचे सचिव झाले.
महत्त्वाच्या बातम्या –
जेम्स अँडरसन कारकिर्दीतील शेवटच्या कसोटीत रचणार इतिहास! अशी कामगिरी करताच बनेल मोठा विक्रम
ईशान किशननं रणजी ट्रॉफी खेळण्यास नकार का दिला होता? समोर आलं धक्कादायक कारण
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, या दिग्गज खेळाडूला बनवलं संघाचा मुख्य प्रशिक्षक