---Advertisement---

विराट ऐवजी भारताच्या वनडे, टी२० संघाचे नेतृत्वपद रोहितकडे सोपवणार? बीसीसीआय सचिवांनी दिले स्पष्टीकरण

---Advertisement---

मागील काही दिवसांपासून विराट कोहलीच्या फलंदाजी आणि नेतृत्वपदाबाबत मोठ्याप्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. त्यातच सोमवारी(१३ सप्टेंबर) असे एक वृत्त समोर आले होते की ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर विराट मर्यादीत षटकांच्या भारतीय संघाचे नेतृत्व सोडेल. त्यानंतर मर्यादीत षटकांसाठी भारताचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात येईल. मात्र, आता याबद्दल बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीच हे वृत्त केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे.

जय शाह यांनी स्पष्ट केले आहे की विराट कर्णधापद सोडण्याचे वृत्त एक अफवा आहे, तसेच सध्या संघाला कसोटी आणि मर्यादीत षटकांसाठी, असे दोन कर्णधार नेमण्याचा कोणताही विचार नाही.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार जय शाह म्हणाले, ‘आम्ही असा कोणताही प्रस्ताव ठेवलेला नाही आणि विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ योग्यप्रकारे पुढे जात आहे.’

याबरोबरच जय शहा यांनी बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धूमळ यांनी नेतृत्वाबाबत केलेल्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. धूमळ यांनी म्हटले होते की ‘मर्यादीत षटकांच्या संघाचे कर्णधारपद विराटच्या ऐवजी रोहितला देण्याचे वृत्त खोटे आहे. आम्ही ही गोष्ट चांगल्या प्रकारे जाणतो की अशा प्रकारचा प्रस्ताव भारतीय क्रिकेटच्या हिताचा नाही आणि तेव्हा, जेव्हा संघाला टी२० विश्वचषक नजीकच्या काळात खेळायचा आहे.’

इंग्लंड दौऱ्यावर ज्यादाचे टी२० सामने
जय शहा यांनी या गोष्टीलाही पुष्टी दिली की जेव्हा पुढील वर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल, तेव्हा इंग्लंड विरुद्ध ज्यादाचे २ टी२० सामने खेळण्यास तयार आहे. ज्यामुळे रद्द झालेल्या मँचेस्टर कसोटीची भरपाई होऊ शकेल.

खरंतर भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर होता. मात्र, ही मालिका सुरु असतानाच भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचे संक्रमण झाले. त्यामुळे मँचेस्टर येथे होणारा पाचवा आणि मालिकेतील अखेरचा सामना खेळण्यास भारतीय खेळाडूंनी नकार दिला. सध्या या मालिकेत ४ सामन्यांनंतर भारत २-१ अशा फरकाने आघाडीवर आहे, मात्र अद्याप मालिकेचा निकाल प्रलंबित आहे.

भारताचा संघ पुढीलवर्षी ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जून-जुलैमध्ये इंग्लंडचा दौरा करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“सध्याच्या भारतीय संघाची फलंदाजी द्रविड, गांगुली, लक्ष्मण, सचिन, सेहवाग यांच्या जवळपासही जाणारी नाही”

“विराटसोबत राजकारण होतेय”, माजी पाकिस्तानी कर्णधाराचा खळबळजनक आरोप

आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा सुरु होण्यापूर्वीच सीएसकेला मोठा धक्का, सलामीवीराला झाली दुखापत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---