येत्या जुलै महिन्यात युवा खेळाडूंनी भरलेला भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणर आहे. या संघाच्या नेतृत्त्वाची धुरा डावखुरा फलंदाज शिखर धवनकडे देण्यात आली आहे. १३ जुलैपासून सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ मुंबईमध्ये सध्या विलगीकरणात आहे. या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद, माजी भारतीय खेळाडू राहुल द्रविडला देण्यात आले आहे. दरम्यान, बीसीसीआयने द्रविडसोबत १८ सदस्यीय सपोर्ट स्टाफला श्रीलंकेला पाठवण्याचे ठरवले आहे.
भारतीय वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात पराभूत झाला आहे. त्यामुळे भारतीय संघ आता येत्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी कडक पाऊले उचलण्याची चिन्हे दिसत आहेत. वर्षाखेरीस होणाऱ्या टी-२० स्पर्धेपुर्वी होणारा श्रीलंका दौरा शिखर धवन आणि युवा खेळाडूंसाठी महत्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, बीसीसीआय दोन निवड समिती कर्मचाऱ्यांनासुद्धा या दौऱ्यावर पाठवणार आहे. अभय कुरुविला आणि देवाशीष मोहंती हे दोघे भारतीय संघासोबत श्रीलंकेला जातील आणि पंच सुधीर असनानी संघ व्यवस्थापकाची भूमिका निभावतील. कोविड-१९मुळे बीसीसीआय इंग्लंड दौऱ्यावर निवड समितीला पाठवू शकली नव्हती. परंतु, आता श्रीलंका दौरा सुद्धा भारतीय संघासाठी महत्वाचा आहे. सुदैवाने आता कोविड-१९ची परिस्थिती आधीच्या मानाने चांगली आहे. त्यामुळे १८ सदस्यीय सपोर्ट स्टाफला श्रीलंकेला पाठवण्यास कसलीही समस्या उद्धवणार नाही.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले की, “ही गोष्ट खरी आहे की, भारतीय संघासोबत २ निवडकर्तेही जाणार आहेत. याबरोबरच १८ लोकांचा सपोर्ट स्टाफसुद्धा जाणार आहे.”
१८ सदस्यीय सपोर्ट स्टाफची नावे खालीलप्रमाणे-
राहुल द्रविड (मुख्य प्रशिक्षक), सुधीर असनानी (व्यवस्थापक), पारस महाम्ब्रे (गोलंदाजी प्रशिक्षक), टी. दिलीप (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक), आशीश कौशिक (फिजियो), निरंजन पंडित (फिजियो), आनंद दाते (प्रशिक्षक), अल हर्षा (प्रशिक्षक), अशोक साध (प्रशिक्षक आणि थ्रोडाउन प्रमुख), नंदन माझी, मगनेश गायकवाड, एल वरुण, आनंद सुब्ररमणियम (मीडिया व्यवस्थापक), अमेया तिलक (कन्टेन्ट प्रोड्यूसर), अभिजीत साळवी (संघाते डॉक्टर), रवींद्र धौलपुरे (एंटी-करप्शन एंड सिक्योरिटी अधिकारी) आणि सुमित मल्लाहपुरक (लॉजिस्टिक्स अधिकारी)
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी पदार्पणात शतक ठोकल्यानंतर गांगुली झाला होता नर्वस, सचिनने ‘अशी’ केली होती मदत
दक्षिण आफ्रिकेच्या अव्वल गोलंदाजाने शोधली पुजाराच्या फलंदाजीतील चूक, वाचा काय म्हणाला
क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी! ‘या’ टी२० लीगमध्ये युवराज, डिविलियर्स अन् गेल घालणार धुमाकूळ?