भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आजपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने जोरदार तयारी केली आहे, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
मार्च महिन्यात या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेत भारतीय संघाने मायदेशातील परिस्थितीचा फायदा घेत इंग्लंडला ४-१ ने धूळ चारली होती. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेत इंग्लंड संघ मागील पराभवाची व्याजासह परतफेड करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. याच कारणास्तव भारतीय संघातील खेळाडू आणखी जोरदार सराव करताना दिसून येत आहेत.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पहिल्या सामन्यासाठीची तयारी दाखवण्यात आली आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहेत. तर गोलंदाज देखील आपल्या गोलंदाजीचा सराव करताना दिसून येत आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणाचा सराव करून घेताना दिसून येत आहे.
या व्हिडिओला कॅप्शन देत बीसीसआयने, “तयारी… स्टेज तयार आहे… ट्रेंट ब्रिजवर सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहे.” असे लिहिले आहे. (Bcci shared video of players practising before first test,watch video)
Preparations ✅
Stage Set 👌
It's a matter of few hours before we witness the LIVE action from Trent Bridge 👏 👏 #TeamIndia #ENGvIND
ARE YOU READY❓ pic.twitter.com/QrGYqoCtFE
— BCCI (@BCCI) August 4, 2021
पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, आर अश्विन, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या-
जडेजा किंवा अश्विनला बाकावर बसवत कोहली ‘या’ शिलेदारावर लावणार डाव, बघा कोण आहे तो?
नेहमी सामन्यापूर्वीच प्लेइंग XI ची घोषणा करणारा कोहली यंदा शांत; म्हणाला, ‘संघाची घोषणा…’
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा रोमांच होणार द्विगुणित, ‘हे’ दिग्गज सामन्यांचे करणार समालोचन