भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी जुलै २०१९मध्ये विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर क्रिकेट खेळताना दिसला नाही. धोनीने भारतीय संघाला २००७चा टी२० विश्वचषक आणि २०११चा वनडे विश्वचषक जिंकून दिला आहे. धोनीने भारतीय संघाला एका वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे.
परंतु आता धोनीच्या (MS Dhoni) भारतीय संघातील पुनरागमनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २०१९च्या उपांत्य सामन्यानंतर धोनीला संघात स्थान दिलेले नाही. यानंतर त्याला बीसीसीआयच्या (BCCI) वार्षिक मानधन कराराच्या यादीतूनही बाहेर करण्यात आले होते. तसेच आता बीसीसीआयने धोनीला त्यांच्या एका पोस्टमधूनही बाहेर केले आहे. त्यामुळे आता चाहत्यांचा राग अनावर होताना दिसत आहे.
झाले असे की, शुक्रवारी (२० मार्च) बीसीसीआयच्या इंस्टाग्रामवरील (Instagram) भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) या पेजला १३ मिलियन म्हणजेच १ कोटी ३० लाख फॉलोवर्स पूर्ण झाले. यानंतर बीसीसीआयने सर्व चाहत्यांना धन्यवाद देत पोस्ट शेअर केली आहे.
बीसीसीआयने ९ भारतीय क्रिकेटपटूंचा फोटो असलेला पोस्टर शेअर केला. भारतीय पुरुष संघातून विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश होता. तर महिला क्रिकेटपटूंमध्ये स्म्रीती मंधना, हरमनप्रीत कौर आणि पुनम यादव यांच्या फोटोचा समावेश होता. परंतु या पोस्टरमध्ये धोनीचा फोटो नसल्यामुळे चाहते निराश झाले आहेत.
चाहत्यांनी बीसीसीआयच्या या पोस्टवर निराशा व्यक्त केली आहे. चाहत्यांच्या मते बीसीसीआयच्या इंस्टाग्राम पेजला पुढे नेण्यात धोनीचे तितकेच योगदान आहे, जितके विराट (Virat Kohli), बुमराह (Jasprit Bumrah) आणि इतर खेळाडूंचे आहे. त्यामुळे धोनीच्या फोटोचा समावेश न करणे धोनीचा अपमान आहे.
अनेक चाहत्यांनी हे पण लिहिले की, धोनीविना भारतीय संघ काहीही नाही. तर एका चाहत्याने लिहिले की, तो बीसीसीआयचे इंस्टाग्राम पेज फक्त आणि फक्त धोनीमुळे फॉलो करतो.
आयपीएल २०२०च्या १३ व्या हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होणार होती. परंतु कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले. अशी चर्चा करण्यात येत होती की, धोनीने आयपीएलमध्ये २०२० (IPL 2020) चांगली कामगिरी केली तर त्याला ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी संघात स्थान देण्यात येऊ शकते.
अशामध्ये आता धोनीच्या पुनरागमनावर (Comeback) अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनिल गावस्कर आणि विरेंद्र सेहवाग यांंनी यापूर्वी म्हटले होते की, आता भारतीय संघाने धोनीच्या जागी बदली खेळाडू शोधण्यास सुरुवात केली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-पंतप्रधान मोदींना का आली युवराज-कैफच्या नेटवेस्ट सिरीजमधील खेळीची आठवण
-सरावावरुन घरी परतणाऱ्या हरियाणाच्या क्रिकेटरचा अपघातात मृत्यु
-भारतीय गोलंदाजांना दुरून खेळणं सोप्पं वाटतं, मैदानात फुटतो घाम