कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केलेली नाही. पण, त्याने त्याच्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. आज (५ नोव्हेंबर) विराट कोहली त्याचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी बीसीसीआयने त्यांचे अभिनंदन केले आहे. या खास प्रसंगी बीसीसीआयने त्याच्या एका इनिंगचा व्हिडिओही शेअर केला आहे.
विराटचे अभिनंदन करताना बीसीसीआयने लिहिले की, ‘२३१५९ आंतरराष्ट्रीय धावा केल्यानंतर तो अजूनही जोमाने पुढे जात आहे. कर्णधार असताना भारतासाठी सर्वाधिक कसोटी विजय. २०११ विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीमधील विजेत्या संघाच्या सदस्याला आणि सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ बीसीसीआयने २०१९ मध्ये कोलकाता येथे बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटीत खेळलेल्या १३६ धावांच्या खेळीचा व्हिडिओही शेअर केला आहे.
विराट कोहली याचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीत झाला. ऑगस्ट २००८ मध्ये त्याने भारतीय संघात पदार्पण केले होते.
23,159 intl. runs & going strong 💪
Most Test wins as Indian captain 👍
2011 World Cup & 2013 Champions Trophy-winner 🏆 🏆Wishing @imVkohli – #TeamIndia captain & one of the best modern-day batsmen – a very happy birthday. 🎂👏
Let's relive his fine ton in pink-ball Test 🔽
— BCCI (@BCCI) November 5, 2021
बीसीसीआयशिवाय कोहलीला शुभेच्छा देताना सेहवागने ट्विटरवर लिहिले की, ‘कठीण काळ जास्त काळ टिकत नाही, पण मजबूत लोक टिकतात. विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ सध्याच्या टी२० विश्वचषकानंतर विराट भारतीय टी२० संघाचा कर्णधार असणार नाही. तो एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार म्हणून कायम राहणार आहे.
Tough times don’t last long, tough people do. A once in a generation player , wishing @imVkohli a very happy birthday and a great year ahead. #HappyBirthdayViratKohli pic.twitter.com/a8Ysq9ff9v
— Virender Sehwag (@virendersehwag) November 5, 2021
पत्नी अनुष्का शर्मानेही विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत. इंस्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘या फोटोसाठी आणि ज्या पद्धतीने तू तुझे आयुष्य जगत आला आहेस, त्यासाठी कोणत्याही फिल्टरची गरज नाही. तुझा गाभा प्रामाणिकपणा आणि धाडसाने बनलेला आहे. अंधाऱ्या जागातून स्वत:ला बाहेर काढणारा दुसरं कोणी मला माहीत नाही.’
https://www.instagram.com/p/CV4iyW_JcnS/
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ६५ पैकी ३८ कसोटी सामने जिंकले आहेत. कोणत्याही भारतीय कर्णधाराने ३० कसोटी जिंकलेल्या नाहीत. कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरी गाठली. धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने २७ कसोटी सामने जिंकले आहेत. परदेशी भूमीवर कोहलीचा खेळ उत्कृष्ट राहिला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजाराहून अधिक धावा, ७० शतके, एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद १२००० धावा आणि कसोटीत ७ द्विशतके अशी अद्भूत कामगिरी विराटच्या नावे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये कोण पोहोचणार आणि कोण जिंकणार? सेहवागने केली भविष्यवाणी
भारत का आहे सर्वात खतरनाक संघ? न्यूझीलंडच्या गोलंदाजाचा मोठा खुलासा
भारत-पाकिस्तान टी२० विश्वचषकाची फायनल सामना खेळतील का? रोहितने दिले ‘रोखठोक’ उत्तर