---Advertisement---

भांगडा, पुष्पगुच्छ-टिळा लावून स्वागत; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंची मस्ती

On: रविवार, जून 19, 2022 4:05 PM
Indian-Cricketers-Fun
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सद्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या मालिकेत सुरुवातीला भारतीय संघ ०-२ ने पिछाडीवर होता. मात्र त्यानंतर त्यांनी दमदार पुनरागमन केले आणि मालिका २-२ ने बरोबरीत आणली आहे. आता या मालिकेचा निकाल बेंगलोरमध्ये होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या टी२० सामन्यावरून ठरेल. तत्पूर्वी टी२० मालिका बरोबरीत आणल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना आनंद गगनात मावेनासा झाला होता. राजकोटमधून बेंगलोरला रवाना होताना भारतीय खेळाडूंनी भरपूर मजा मस्ती केली, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. 

बीसीसीआयने (BCCI) शेअर केलेल्या व्हिडिओत दिसते की, राजकोट येथे झालेल्या चौथ्या टी२० सामन्यातील विजयानंतर भारतीय संघ चांगल्या मूडमध्ये दिसला. राजकोटवरून बेंगलोरला रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी भरपूर मस्ती (Indian Players Fun) केली. त्यांची ही मस्ती विमानातही सुरूच होती.

राजकोटमधील हॉटेलमधून निघाल्यानंतर भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग भांगडा करताना दिसला. त्यानंतर चौथ्या सामन्यातील भारतीय संघाच्या विजयाचे नायक आवेश खान आणि दिनेश कार्तिक यांनी एकत्र मिळून केक कापला. त्यानंतर बेंगलोरला जाताना विमानातही भारतीय खेळाडू मस्तीच्या मूडमध्ये दिसले. विमानात बसण्यापूर्वी भारतीय क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी जमा झालेल्या चाहत्यांचे त्यांनी अभिवादन केले. तसेच इशान किशन आणि आवेश खान चाहत्यांनी बोलतानाही दिसले. बेंगलोरमध्ये पोहोचल्यानंतर सर्व खेळाडूंचे पुष्पगुच्छ देत, टिळा लावून धामधूमीत स्वागत करण्यात आले.

पाचव्या टी२० सामन्यासाठी संभाव्य संघ-

दक्षिण आफ्रिका-
टेम्बा बावुमा (कर्णधार)/ रीझा हेन्ड्रिक्स, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेविड मिलर, हेन्रिक क्लासेन, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, मार्को जेन्सन/कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, तबरेझ शम्सी, एन्रिच नॉर्किया

भारत-
ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

रणजी ट्रॉफी फायनल | कर्णधार म्हणून २३ वर्षांपूर्वी जे जमले नाही, ते प्रशिक्षक बनून करणार चंद्रकांत पंडित

दिनेश कार्तिकचं पहिलं प्रेम हिरावणारा क्रिकेटर पुनरागमनासाठी सज्ज, २ वर्षांनंतर उतरतोय मैदानात

मुंबई-मध्य प्रदेशमध्ये रंगणार रणजी ट्रॉफीची फायनल, जाणून घ्या आजवरचे विजेता-उपविजेता एका क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---