fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आयपीएल २०१९चा अंतिम सामना चेन्नईला नाही तर होणार या ठिकाणी

आयपीएल 2019 चा मोसमाचा 12 मे रोजी होणारा अंतिम सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडीयमवरुन हलवण्यात आला आहे. आता हा अंतिम सामना हैद्राबाद येथे होणार आहे. चेन्नईतील स्टेडियमवरील तीन स्टँड उघडण्याची परवानगी तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनला (टिएनसीए) मिळाली नसल्याने हा सामना चेन्नईतून हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असे असले तरी चेन्नई सुपर किंग्सने जर गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकामध्ये स्थान मिळवले तर त्यांना त्यांच्या घरच्या प्रेक्षकांसमोर 7 मेला क्वालिफायर 1 चा सामना खेळण्याची संधी आहे.

त्याचबरोबर 8 मे ला होणारा एलिमिनेटरचा सामना आणि 10 मे ला होणारा क्वालिफायर 2 चा सामना विशाखापट्टणमला होणार आहे. हे सामने आधी हैद्राबाद येथे होणार होते. परंतू हैद्राबाद येथे 6,8 आणि 10 मे रोजी लोकसभा निवडणूकांचे मतदान होणार आहे. त्यामुळे हे सामने हैद्राबादमधून हलवण्यात आले आहेत.

याबद्दल बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समीतीचे अध्यक्ष विनोद राय म्हणाले, ‘टिएनसीएने आम्हाला कळवले आहे की त्यांना I, J आणि K हे तीन स्टँड्स उघडण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही चेन्नईतील सामना हैद्राबादला हलवला आहे.’

‘बाद फेरीतील तिकीट विक्री हा बीसीसीआयचा विशेषाधिकार आहे. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. आम्ही बाद फेरीतील दोन सामने विशाखापट्टणम येथे घेणार आहे.’

चिदंबरम स्टेडियमवरील I,J आणि K या तीन स्टँड्समध्ये जवळजवळ 12 हजारांपेक्षा अधिक प्रेक्षक उपस्थित राहू शकतात. त्यामुळे बीसीसीआयला काही करोडो रुपयांचे नुकसान झाले असते.

पण जर बाद फेरीतील तिकीट विक्री हा बीसीसीआयचा विशेषाधिकार आहे आणि तरीही बाद फेरीतील क्वालिफायर 1 चेन्नईला का खेळवली जात आहे, असे विचारल्यावर राय म्हणाले, ‘चेन्नई सुपर किंग्स हे गतविजेते आहेत. त्यामुळे चेन्नईला क्वालिफायर 1 आणि अंतिम सामना आयोजित करण्याचा मान मिळाला होता.’

‘पण आता जर ते गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर राहिले तर तूम्ही त्यांचे सर्व सामने घेऊ शकत नाही. ते एकतरी बाद फेरीतील सामना घरच्या मैदानावर खेळण्यास पात्र आहेत.’

महत्त्वाच्या बातम्या – 

१० वर्षांपूर्वीचा तो फोटो पाहुन कोहली, स्टेनने दिली अशी प्रतिक्रिया, पहा व्हिडिओ

धोनीला असे करताना पाहुन पार्थिव पटेलही झाला आश्चर्यचकित…

…म्हणून एमएस धोनीने काढल्या नाही त्या एकेरी धावा

You might also like