आयपीएल २०२२ मध्ये सोमवारी (०२ मे) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर एक खेळाडू प्रकाशझोतात आला आहे. हा खेळाडू म्हणजे, रिंकू सिंग. रिंकूने या सामन्यात राजस्थानच्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताकडून नाबाद ४२ धावांची मॅच विनिंग खेळी केली. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याच्या योगदानामुळे कोलकाताने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. आयपीएलमध्ये धूम मचावणाऱ्या या फलंदाजाला एकदा बीसीसीआयकडून शिक्षाही मिळाली आहे.
रिंकूने (Rinku Singh) २०१४ साली ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट आणि रणजी ट्रॉफीमध्ये धडाकेबाज खेळी केल्या होत्या. मात्र २०१९ मध्ये रिंकू परवानगीविना अबू धाबीत क्रिकेट (Abu Dhabi Cricket Tournament) खेळायला गेला होता. येथे कोणत्याही परवानगीशिवाय त्याने टी२० क्रिकेट स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ज्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर ३ महिन्यांची बंदी झाली (Rinku Singh Suspended) घातली होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
मात्र आता रिंकूने राजस्थानविरुद्ध महत्त्वपूर्ण खेळी करत पुन्हा एकदा सर्वांना आपले कौतुक करण्यास भाग पाडले आहे. आयपीएल कारकिर्दीतील १३वा सामना खेळणारा अलिगडचा रिंकू (Rinku Singh) जेव्हा फलंदाजीसाठी मैदानावर उतरला, तेव्हा संघाने ९२ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या. सामना रोमांचक स्थितीत होता. अशात राजस्थानच्या गोलंदाजांचे सगळे डावपेच चुकीचे ठरवत रिंकूने २३ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ४२ धावा फटकावल्या. तसेच त्याने चौथ्या विकेटसाठी नितीश राणासोबत मिळून ६६ धावांची अभेद्य भागीदारीही रचली.
ही रिकूंच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. आपल्या या प्रशंसनीय खेळीनंतर रिंकू म्हणाला की, “अलीगडशी संबंध असणारे कित्येक खेळाडूंनी रणजी ट्रॉफीमध्ये सहभाग घेतला आहे. परंतु आयपीएल खेळणारा मी पहिलाच खेळाडू आहे. आयपीएल इतर देशांतर्गत स्पर्धेंपेक्षा खूप वेगळा आहे. मी गेल्या ५ वर्षांपासून या संधीची प्रतिक्षा करत होतो, परंतु मला सातत्याने संधी मिळत नव्हत्या. मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या आहेत, ज्याच्या बळावर मला आयपीएलमध्येही चांगले प्रदर्शन करण्याचा विश्वास होता.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पंड्याच्या मुलाला कडेवर घेऊन राशिद खानने लावले ठुमके; पाहून तुमचेही थिरकतील पाय
‘…तर तो लवकरच एक चांगला खेळाडू बनेल’, मोहसिन खानची गोलंदाजी पाहून गंभीर खुश
आला आला, बांद्रा एक्सप्रेस आला! अर्जुनच्या पदार्पणाची चातकासारखी वाट पाहतायत चाहते, कधी मिळणार संधी?