शनिवारी (29 फेब्रुवारी) हेगली ओव्हल (Hagley Oval) येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय नियामक मंडळाने (BCCI) ख्राईस्टचर्च (ChristChurch) मैदानावरील खेळपट्टीबद्दल पोस्ट शेअर करत सर्वांना कोड्यात पाडले आहे.
बीसीसीआयने हेगली ओव्हल या मैदानाचा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत बीसीसीआयने लिहिले की, ‘खेळपट्टी शोधून दाखवा’. या फोटोसोबत विचार करणाऱ्या ईमोजींचाही समावेश करण्यात आला आहे.

Spot the pitch ????????#NZvIND pic.twitter.com/gCbyBKsgk9
— BCCI (@BCCI) February 27, 2020
या मैदानाच्या खेळपट्टीवर खूप गवत आहे. खेळपट्टीचा भाग हा मैदानावरील इतर भागासारखा दिसत आहे. त्यामुळे खेळपट्टी नेमकी कुठे आहे हे ओळखता येत नाहीये.
पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताला 10 विकेट्सने पराभूत केले होते. यावेळी भारताला न्यूझीलंड गोलंदाजांच्या वेगवान आणि उसळी चेंडूचा सामना करावा लागला होता.
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनरने म्हटले आहे की, न्यूझीलंड संघ शनिवारपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही हीच रणनीती (वेगवान आणि उसळी चेंडू) वापरणार आहे.
जर दुसरा कसोटी सामनाही भारताने गमावला तर भारत आयसीसी कसोटी चँपियनशिपमध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिकेत पराभूत होईल. त्यामुळे आता ख्राईस्टचर्च येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजय मिळवितो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
टीम इंडियाने चौथ्यांदा केला #iccwomenst20worldcup च्या उपांत्यफेरीत प्रवेश. ७ विश्वचषकात २००९, २०१०, २०१८ आणि २०२० असे चार विश्वचषक टीम इंडिया उपांत्यफेरीत. #म #मराठी pic.twitter.com/lwoikc4zrb
— Maha Sports (@Maha_Sports) February 27, 2020
बुमराहने पुन्हा तेच केलं तर मग मात्र टीम इंडियाचं…
वाचा- ???? https://t.co/7030QuztMh????#म #मराठी #Cricket #TeamIndia @Jaspritbumrah93— Maha Sports (@Maha_Sports) February 27, 2020





