दोन दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय क्रिकेट चाहते आणि खेळाडू या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच भारतीय क्रिकेटची सर्वोच्च संस्था असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एका वेगळ्याच कारणासाठी चाहत्यांचे धन्यवाद मानले आहे.
या कारणाने बीसीसीआयने मानले चाहत्यांचे आभार
सर्व चाहते लॉर्ड्स कसोटीचा आनंदोत्सव साजरा केला जात असतानाच बीसीसीआयने भारतीय चाहत्यांचे आभार मानण्यासाठी एक ट्विट केले आहे. बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलचे १५ दशलक्ष अनुसारक (फॉलोवर्स) झाल्याबद्दल हे ट्विट करण्यात आले. या ट्विटला कॅप्शन देताना ‘१५ दशलक्ष खंबीर, या प्रेमासाठी व पाठिंब्यासाठी धन्यवाद.’ असे लिहिण्यात आले आहे. बीसीसीआयने ऑगस्ट २०१० पासून ट्विटर वापरण्यास सुरुवात केली होती.
1️⃣5⃣ Million strong 💪
Thank you for all the love and support 💙#TeamIndia pic.twitter.com/dT5t0cgf2f
— BCCI (@BCCI) August 18, 2021
आयसीसीपेक्षा अधिक अनुसारक
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयचे ट्विटरवर क्रिकेटची सर्वोच्च संचालन संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपेक्षा (आयसीसी) अधिक अनुसारक आहे. आयसीसीचे सध्या ट्विटरवर १२.९ दशलक्ष अनुसारक आहेत. ट्विटरवर पाकिस्तान क्रिकेटचे ३.३ दशलक्ष, दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे १.२ दशलक्ष, श्रीलंका क्रिकेटचे १ दशलक्ष व इंग्लंड क्रिकेटचे १.१ दशलक्ष अनुसारक आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड क्रिकेट व वेस्ट इंडीज क्रिकेट या क्रिकेट बोर्डाचे ट्विटर अनुसारक काही लाखांमध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
तिसऱ्या कसोटीत देखील भारतीय संघ फडकवणार विजयी पताका? हेडिंग्ले मैदानावर असा आहे भारताचा रेकॉर्ड
टी२० विश्वचषकातील सर्वात मोठा विक्रम विराटच्या दृष्टीक्षेपात!
विराट अँड कंपनीकडे तब्बल ३५ वर्षानंतर ‘असा’ पराक्रम करून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी