भारताचा वरिष्ठ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. तर दुसरीकडे १९ वर्षांखालील भारतीय संघ १९ वर्षांखालील विश्वचषक (Under-19 World Cup) खेळतो आहे. या स्पर्धेतील आपले दोन्ही साखळी फेरी सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा पक्की करणाऱ्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. भारतीय संघाचा कर्णधार यश धुल (Yash Dhull) आणि उपकर्णधार एसके राशिद यांच्यासह ६ खेळाडू कोरोना संक्रमित झाले (Covid Positive) होते. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अजून ५ खेळाडूंना वेस्ट इंडिजला पाठवण्याचे ठरवले आहे.
बुधवारी (१९ जानेवारी) भारताने आयर्लंडविरुद्ध (India vs Ireland) आपला दुसरा साखळी फेरी सामना खेळला. मात्र या सामन्यात कर्णधार यश आणि उपकर्णधार राशिद मैदानावर उतरले नव्हते. कारण ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे आयर्लंडविरुद्ध निशांत सिंधूच्या हाती संघाची कमान देण्यात आली होती. कर्णधार यश आणि उपकर्णधार राशिदव्यतिरिक्त मानव पारख, सिद्धार्थ यादव, आराध्य यादव आणि वासु वत्स आयसोलेशनमध्ये होते.
व्हिडिओ पाहा- अभ्यासू कीडा असलेला Axar Patel फक्त आज्जीमुळे बनला क्रिकेटर
परंतु बुधवारी संध्याकाळी पुन्हा एकदा सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये वेगवान गोलंदाज वासु वत्स कोरोनाची लक्षणे असूनही त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता भारताकडे १२ खेळाडू उपस्थित आहेत. म्हणून शनिवारी रोजी (२२ जानेवारी) भारत विरुद्ध युगांडामधील शेवटचा साखळी फेरी सामना निश्चित वेळेत पूर्ण होईल.
बीसीसीआय ५ खेळाडूंना वेस्ट इंडिजला पाठवणार
तरीही उपांत्यपूर्व सामन्यापूर्वी बीसीसीआय २ फलंदाज, १ यष्टीरक्षक, १ अष्टपैलू आणि एका वेगवान गोलंदाजाला १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी त्रिनिदाद आणि टोबॅगोला पाठवण्याची योजना (BCCI To Send 5 Reserve Players To West Indies) आखत आहेत. बोर्डाने उजय सहारन, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), रिथिश रेड्डी, अंश गोसाई आणि पीएम सिंग राठोड या खेळाडूंची निवड केली आहे. बीसीसीआयची लॉजिस्टिक टीम या खेळाडूंच्या प्रवास योजनेवर काम करत आहे. कारण या खेळाडूंना वेस्ट इंडिजमधील एंटिंगामध्ये ६ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करणे बंधनकारक असेल. शुक्रवारी संध्याकाळी या खेळाडूंना एंटिगाला पाठवण्याच्या प्रक्रियेवर अंतिम निर्णय घेतला जाईल.
याखेरीज २९ जानेवारी रोजी भारतीय संघाचा उपांत्यपूर्व सामना होईल, ज्यामुळे इतर खेळाडूनांही कोरोनातून बरे होण्यास पूरक अवधी मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू कोरोनाच्या विळख्यात, सोशलवर दिली माहिती
एअर इंडिया कॉलनीमधील ‘त्या’ घरामध्ये सुशांत ‘त्याच’ ठिकाणी जमिनीवर जाऊन झोपला
दुसरी वनडे : केएल राहुलने टाॅस जिंकला, भारत प्रथम बॅटींग करणार; पाहा कोणकोण खेळतंय दुसर्या सामन्यात
हेही पाहा-