भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या ३ वर्षांपासून खराब फॉर्ममधून जात आहे. एकवेळी एकामागोमाग सामन्यांमध्ये शतकांची बरसात करणाऱ्या विराटला २०१९ नंतर एकही शतक करता आलेले नाही. तो साध्या दुहेरी धावाही करण्यासाठी झगडताना दिसत आहे. विराटच्या खराब फॉर्मच्या चर्चा सुरू असतानाच भारताच्या संघ निवडकर्त्यांनी त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती दिल्यानंतर झिम्बाब्वेविरुद्धही त्याला भारतीय संघात सहभागी केले गेलेले नाही. अशात आता बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.
विराटसोबत (Virat Kohli) तेच होत आहे, जे यापूर्वी माजी भारतीय दिग्गज सचिन तेंडूलकर (Sachin Tendulakr) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्यासोबत घडले आहे, असे धुमाळ (BCCI Treasurer Arun Dhumal) यांचे म्हणणे आहे. एका वरिष्ठ क्रिडा पत्रकाराशी ते बोलत होते.
धुमाळ म्हणाले की, “आपण या सर्व गोष्टींबद्दल जास्त विचार करत नाही. ही तर चाहत्यांची क्रिकेटप्रती असलेली आवड आहे, ज्यामुळे ते अशा गोष्टींबद्दल चर्चा करायला भाग पडतात. जेव्हा तुमच्या एखाद्या गोष्टीच्या भावनांशी जोडले जाता, तेव्हा तुम्ही अशा सर्व गोष्टी आपसूकच बोलून जाता. आजच्या जमान्यात तर सोशल मीडियाने एक मंच उपलब्ध करून दिला आहे, जिथे तुम्ही अशा गोष्टी बोलू शकता. येथे लोक त्यांच्या मनातील गोष्टी विना कोणते प्रतिबंध बोलू शकतात.”
विराटने टी२० विश्वचषक २०२१ नंतर स्वत:च भारतीय संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कसोटी संघाचे नेतृत्त्वपदही त्याने स्वेच्छेने सोडले होते. मात्र वनडे संघाच्या नेतृत्त्वपदावरून त्याला काढून टाकण्यात आले. त्याच्यानंतर रोहित शर्माला क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपातील संघांचा कर्णधार बनवले गेले आहे.
याबद्दल बोलताना धुमाळ म्हणाले की, “आपण असेच काहीसे सुनिल गावसकर आणि कपिल देव यांच्यासोबतही पाहिले होते. त्यानंतर असेच सौरव गांगुली आणि सचिन तेंडूलकर यांच्यासोबतही हे घडले होते. सोशल मीडियावर अशा गोष्टी इतक्या मर्यादेपर्यंत दाखवल्या जातात की, लोक त्याला सत्य मानू लागतात.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्याप्रमाणेच शेवटचे दोन सामनेही उशिरा सुरू होणार? जाणून घ्या टायमिंग
भारतापुढे तगड्या इंग्लंडचे आव्हान, उपांत्य सामन्यात ‘या’ मजबूत ११ खेळाडूंना उतरवणार हरमनप्रीत
BREAKING: एका तासात कुस्तीत भारताला तीन गोल्ड; बजरंग-साक्षीपाठोपाठ दीपक पुनियाने रचला इतिहास