भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर २६ डिसेंबरपासून खेळला जाईल. यजमान ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा दणदणीत पराभव करत १-० ने आघाडी घेतली आहे. भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ या पहिल्या कसोटीत सपशेल अपयशी ठरला होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याच्या जागी शुबमन गिलला संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. त्याचवेळी, बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून गिलचा सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
पृथ्वी शॉने केली होती पहिल्या सामन्यात खराब कामगिरी
भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट संघाचा कर्णधार राहिलेला पृथ्वी शॉ ऍडलेड येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत अपयशी ठरला. कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या दुसऱ्याच चेंडूवरच मिचेल स्टार्कने शून्यावर त्याचा त्रिफळा उडवला होता. दुसऱ्या डावातही पॅट कमिन्सने चार धावांवर त्याला तंबूत धाडले होते. त्यानंतर, शॉला संघातून वगळण्यात मागणी जोर धरू लागली आहे. भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर व माजी सलामीवीर गौतम गंभीर यांनी शॉला संघातून बाहेर करण्यात यावे असे म्हटले होते.
बीसीसीआयने केले ट्वीट
पृथ्वी शॉला संघातून वगळून त्याच्या जागी दुसरा प्रतिभावान सलामीवीर शुबमन गिलला संधी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्याचवेळी, बीसीसीआयने शुबमन गिल सराव करत असतानाचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला. या लहानश्या व्हिडिओमध्ये गिल अत्यंत कुशलतेने चेंडू मारताना दिसतोय. गोलंदाजाकडून टाकले जाणारे चेंडू गिलच्या बॅटच्या मधोमध लागत होते. त्या व्हिडिओखाली बीसीसीआयने, ‘छान आणि शुद्ध’ असे कॅप्शन लिहिले. या व्हिडिओमुळे गिल मेलबर्न येथील दुसऱ्या कसोटीत कसोटी पदार्पण करण्याची शक्यता वाढली आहे.
Nice and clean from @RealShubmanGill 😎 #TeamIndia #AUSvIND pic.twitter.com/oHGQsJhDHh
— BCCI (@BCCI) December 23, 2020
फॉर्ममध्ये दिसला गिल
शुबमन गिल आयपीएलपासून उत्तम फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध झालेल्या दुसऱ्या तीनदिवसीय दिवस-रात्र सराव सामन्यात गिलने अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे गिल मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आपले कसोटी पदार्पण करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
डेव्हिड वॉर्नर बनलाय डॉन, बघा संपूर्ण व्हिडिओ
हा तर कहरच झाला! ‘या’ फलंदाजाने मारलेल्या षटकाराचा चेंडू चक्क झाडाच्या फांद्यांमध्ये अडकला
व्हिडिओ: भारतीय संघ सरावात घेतोय कठोर मेहनत, दुसर्या कसोटीतील प्लेइंग इलेव्हनचेही मिळाले संकेत