भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने सामन्यात आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात ३२५ धावा उभारल्यानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ ६२ धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर दुसर्या डावात भारतीय संघाने बिनबाद ६९ धावा बनविल्या आहेत. मात्र, भारताच्या दुसऱ्या डावात नियमित सलामीवीर शुबमन गिल हा फलंदाजीला आला नाही. त्याला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली होती. आता बीसीसीआयने या विषयी महत्त्वाचे अपडेट दिले आहे.
क्षेत्ररक्षण करत असताना झालेली दुखापत
न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करत असताना गिल शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण करत होता. अक्षर पटेल गोलंदाजी करत असताना त्याने टाकलेल्या चेंडूवर न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज हेन्री निकोल्सने जोरदार फटका मारला. जो गिलच्या हातावर जाऊ लागला. यानंतर तो वेदनेने विव्हळताना दिसला. भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल यांनी त्याच्यावर उपचार केले. मात्र, त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. यानंतर भारताच्या दुसऱ्या डावातही तो फलंदाजीला आला नाही. त्याच्या जागी चेतेश्वर पुजाराने सलामीवीराची भूमिका निभावली.
बीसीसीआयने दिली माहिती
गिलच्या या दुखापतीवर बीसीसीआयने ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली. बीसीसीआयने लिहिले,
‘शुबमन गिलच्या डाव्या कोपरावर क्षेत्ररक्षण करताना आघात झाला. तो यातून सध्या सावरत असून, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी येऊ शकला नाही.’
गिलने या सामन्याच्या पहिल्या डावात शानदार ४४ धावांची खेळी केली होती.
???? Update ????: Shubman Gill suffered a blow to his right elbow while fielding in the first innings. He has not recovered completely and hence not taken the field as a precautionary measure.#TeamIndia #INDvNZ @Paytm pic.twitter.com/UqSzXYTce2
— BCCI (@BCCI) December 4, 2021
भारतीय संघ सामन्यात पुढे
भारतीय संघ पहिल्या डावात ३२५ धावांवर सर्व शबाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा दुसरा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत न्यूझीलंडला केवळ ६२ धावांवर रोखले. त्यानंतर भारतीय संघासाठी सलामी देताना दुसऱ्या डावात मयंक अगरवाल व चेतेश्वर पुजारा यांनी बिनबाद ६९ धावा केल्या आहेत. भारतीय संघाची आघाडी ३३२ धावांची झाली आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपले स्थान उंचावू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
लक्ष्मणच्या एनसीए प्रमुखपदाविषयी जय शहांनी दाखवले नियमांकडे बोट; म्हणाले, “यासाठी त्यांना…”
‘कोणत्याही भारतीयाला दुसऱ्या देशात जाऊ देऊ नका’; दिग्गजाने केली मागणी
हर्षलने ‘या दिग्गजाला दिले आपल्या ‘झकास’ कामगिरीचे श्रेय; म्हणाला…






