भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर पार पडला. उभय संघांतील या सामन्यात पहिल्या दिवसापासून खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी मदतगार असल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सेशनपासून खेळपट्टीवर अनियमित टर्न आणि बाऊंस पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर आयसीसीने या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त करत तीन डिमेरिट पॉइंट्स दिले. माध्यमांतील वृत्तांनुसार बीसीसीआय आयसीसीच्या या निर्णयाला आव्हान देऊ शकते.
इंदोर कसोटीत खेळपट्टी फिरकीसाठी मदतगार असल्याने सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात लागला. पहिल्या दोन सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजांच्या जोरावर जिंकणारा भारत, या सामन्यात मात्र पराभूत झाला. फिरकीसाठी किफायतशीर असलेल्या याच खेळपट्टीवर यावेळी भारतीय फलंदाजच अडचणीत आले आणि ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. तिसऱ्या सामन्यातील खेलपट्टी आयसीसीने खराब शेरा दिल्यानंतर बीसीसीआय या निर्णयाशी सहमत नसल्याचे सांगितले जात आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार बीसीसीआय आयसीसीच्या या निर्णयाला आव्हान देण्याच्या तयारीत आहे. एका बीसीसीआय अधिकाऱ्याने दिलिल्या माहितीनुसार, “आम्ही परिस्थिती पाहू आणि नंतर आयसीसीच्या निर्णयाला आव्हान देण्याविषयी निर्णय घेऊ.” दरम्यान, आयसीसीच्या नियमांप्रमाणे कोणताही संघ अशा निर्णयानंतर 14 दिवसांच्या आत आबली बाजू मांडू शकतो. म्हणजेच सध्या बीसीसीआयकडे आयसीसीच्या अशा निर्णयाला आव्हान देण्यासाठी पुरेसा वेळ शिल्लक आहे.
इंदोर कसोटी संपल्यानंतर आयसीसीचे मॅच रेफरी क्रिस ब्रॉड यांनी खेळपट्टीचा सविस्तर अहवाल दिला होता. अहवालात असे सांगितले होते की, “खेळपट्टी अगदी कोरडी होती. चेंडू आणि बॅट या दोन्हींसाठीही खेळपट्टी समान फायदेशीर ठरली नाही. सुरुवातीपासून फक्त फिरकी गोलंदाजांना याठिकाणी मदत मिळाली. संपूर्ण सामन्यात खेळपट्टीवर अनियमित बाउंस पाहायला मिळाला.” आयसीसीकडून मिळालेले तीन डिमेरिट पॉइंट्स इंदोरच्या होळकर स्टेडियम व्यवस्थापकांसाठी चिंतेची बाब आहे. कारण पाच वर्षाच्या कालावधीत कोणत्याही एका स्टेडियमवर आयसीसीकडून 5 डिमेरिट पाँइंड्स मिळत असतील, तर त्या मैदानाला एक वर्षासाठी एकही सामना खेळवला जात नाही.
(BCCI upset over poor rating of Indore pitch, will challenge ICC’s decision)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त, मोठ्या काळापासून होता संघातून बाहेर
विंबल्डन खेळलेला भारतीय क्रिकेटर, इंग्लंडमध्ये राहून टेनिसवर गाजवलं अधिराज्य