---Advertisement---

SLvIND: यजमान श्रीलंकेच्या संघाची स्थिती अस्पष्ट, बीसीसीआयने दिली अंतिम चेतावणी!

On: रविवार, जुलै 11, 2021 12:47 PM
---Advertisement---

भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. उभय संघात या दौऱ्यावर टी-२० आणि वनडे मालिकांचा थरार थरार रंगणार आहे. परंतु मालिका सुरू होण्यापूर्वी श्रीलंकाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ज्यामुळे ही मालिका काही दिवस पुढे ढकलण्यात आले आहे. परंतु बीसीसीआयने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला एका गोष्टीसाठी चेतावणी दिली आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शनिवारी (१० जुलै) मालिकेच्या वेळापत्रकात बदल झाल्याची माहिती दिली होती. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला बॅकअप संघ तयार ठेवण्याची चेतावणी दिली आहे. कारण नुकतेच दांबुला येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कॅम्पमधील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. परंतु याबाबत श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने कुठलीही अधिकृत माहिती दिली नाही. (BCCI warns Sri Lanka Cricket Board)

फलंदाजी प्रशिक्षक आणि डेटा विश्लेषक यांना झाली कोरोनाची लागण
यापुर्वी श्रीलंका संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर आणि डेटा विश्लेषक जीटी निरोशन यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. ही माहिती मिळताच श्रीलंका संघातील खेळाडूंना विलागिकरणात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांची आरटी-पीसीआर चाचणी होणार आहे. ही चाचणी झाल्यानंतर त्यांना बायो बबलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला बॅकअप संघ निवडून ठेवण्यास सांगितले आहे. जेणेकरुन वरिष्ठ संघातील खेळाडूंनाही कोरोनाची बाधा झाल्याने किंवा इतर काही कारणास्तव भारताविरुद्ध खेळता आले नाही. तर बॅकअप खेळाडूंचा संघ मैदानात उतरेल. यामुळे ठराविक वेळापत्रकानुसार दौरा पार पडेल.

असे असेल भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – १८ जुलै
२) दुसरा वनडे सामना – २० जुलै
३) तिसरा वनडे सामना – २३ जुलै
टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २५ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २७ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २९ जुलै

असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज :
ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग

महत्वाच्या बातम्या-

सलग दुसऱ्या वनडेत अव्वल फलंदाज आझम सपशेल फ्लॉप, लहाण्या चाहत्याची प्रतिक्रिया व्हायरल

‘या’ क्रिकेटरवर जीवघेणा हल्ला, चाहते बनून आरोपी घुसले होते घरात; दोघांना अटक

फर्स्ट क्लास! ब्रावोने एका हाताने ठोकला कडक सिक्स, गोलंदाजाने नवलाने तोंडात घातली बोटे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---