---Advertisement---

सलग दुसऱ्या वनडेत अव्वल फलंदाज आझम सपशेल फ्लॉप, लहाण्या चाहत्याची प्रतिक्रिया व्हायरल

On: रविवार, जुलै 11, 2021 11:30 AM
---Advertisement---

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना शनिवारी (10 जुलै) लॉर्ड्स येथे पार पडला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीच्या शानदार गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ 45.2 षटकांत 247 धावांवर सर्वबाद झाला. हसनने 51 धावा देत 5 बळी घेतले. मात्र पाकिस्तानचे फलंदाज इंग्लंडचे आव्हान पूर्ण करू शकले नाहीत आणि 52 धावांनी त्यांचा पराभव झाला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सलग दुसर्‍या एकदिवसीय सामन्यातही फ्लॉप झाला. हे पाहून एका चिमुकल्या चाहत्याने दिलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला शून्यावर बाद करणाऱ्या साकिब महमूदने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यातही त्याला बाद केले. 19 धावा केल्यावर बाबरला साकिबने पायचीत केले. आझम बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर एका मुलाची प्रतिक्रिया जोरदार व्हायरल होत आहे. मुलाच्या प्रतिक्रियेमुळे आझमवर टीका केली जात आहेत.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज साकीब महमूदने खाते न उघडू देता पहिल्या एकदिवसीय सामन्यात बाबर आझमला तंबूमध्ये परत पाठवले होते. यानंतर आता दुसऱ्या सामन्यातही आझम साध्या २० धावाही न करू शकल्याने चाहत्यांचे निशार होणे साहजिक होते.

https://twitter.com/RogerThatSir_/status/1413149341666005010?s=20

दुसर्‍या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, शनिवारी रात्री पावसामुळे उशिरा सामना सुरू झाला. त्यामुळे दोन्ही संघांना 47 षटकांचा खेळ खेळण्यास सांगितले गेले होते. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 45.2 षटकांत 247 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून फिलिप सॉल्टने सर्वाधिक 60 धावा केल्या होत्या. त्याच बरोबर जेम्स व्हिन्सने 56 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून 56 वा एकदिवसीय सामना खेळणार्‍या हसन अलीने आपल्या कारकीर्दीतील चौथ्यांदा 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 41 षटकांतच केवळ 195 धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून साउड शकीलने सर्वाधिक 56 धावा केल्या. इतर फलंदाजांना मोठी आकडी खेळी न करता आल्याने त्यांचा पराभव झाला. यासह इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ क्रिकेटरवर जीवघेणा हल्ला, चाहते बनून आरोपी घुसले होते घरात; दोघांना अटक

फर्स्ट क्लास! ब्रावोने एका हाताने ठोकला कडक सिक्स, गोलंदाजाने नवलाने तोंडात घातली बोटे

रसेलच्या तूफान फटकेबाजीने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा उडाला थरकाप, टी२०त पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---