मागच्या काही आठवड्यांपासून भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) चर्चेचा विषय ठरत आहे. भारताचा कसोटी संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असला, तरी या दौऱ्यापूर्वी विराटकडून एकदिवसीय संघाचे कर्णधापद काढून घेण्यात आले आहे. ८ डिसेंबरला बीसीसीआयने (BCCI) दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आणि त्याचवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) याला एकदिवसीय संघाचा नवीन कर्णधार घोषित केले. अता अशी माहिती समोर येत आहे की, विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यासाचा बीसीसीआयचा आधीपासूनच प्रयत्न होता.
काही वृत्तांमध्ये असा दावा केला गेला आहे की, बीसीसीआय आधीपासूनच विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधापदावरून हटवण्याच्या प्रयत्नात होते. क्रिकट्रॅकरच्या वृत्तानुसार, या गोष्टीचे संकेत मिळतात की विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याची गोष्ट बोर्डच्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात आधीपासूनच होती. वृत्तानुसार याच कारणास्तर हे दोन अवघड निर्णय एकापाठोपाठ घेतले गेले.
तत्पूर्वी विराटने टी२० विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद स्वतःच्या इच्छेने सोडले होते. त्यानंतर तो कसोटी आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार होता, पण दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने विराटच्या जागी रोहित शर्मला एकदिवसीय संघाचा नवीन कर्णधार घोषित केले. त्यानंतर एका नवीन वादाला तोंड फुटले. रोहित, बीसीसीआय आणि विराट यांच्याविषयी अनेक अंदाज व्यक्त केले गेले, तसेच वेगवेगळ्या बातम्याही आल्या.
या सर्व घडामोडींमध्ये बीसीसीआय अध्यक्षांनी दावा केला की, त्यांनी विराटला टी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नको, अशी विनंती केली होती. पण विराटने ही गोष्ट खोटी असल्याचे स्पष्ट केले होते. दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विराटने सांगितले की, टी२० संघाचे कर्णधारपद सोडताना त्याच्याही कोणीही चर्चा केली नव्हती. तसेच एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून काढण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी त्याला ही माहिती दिली गेली होती.
महत्वाच्या बातम्या –
वेगवान गोलंदाजीत हातखंडा असलेला इंग्लिश बॉलर अचानक करू लागला ऑफ स्पिन; पाहून आयसीसीही थक्क
‘या’ ३ दिग्गज क्रिकेटपटूंनी निवृत्तीची केली खूपच घाई, अजूनही करू शकले असते दमदार प्रदर्शन