टोकियो ऑलिम्पिक २०२० चे शुक्रवारी (२३ जुलै) बिगुल वाजले. परंपरागत उद्घाटन सोहळ्यात सर्व देशांनी संचलन करून तसेच ऑलिम्पिक ज्योत पेटवून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्यात प्रथेप्रमाणे सर्व सहभागी देशांचे संचलन झाले. भारतीय पथकाचे या संचलनात २१ वे स्थान होते. मात्र, संचलनात सहभागी देशांची क्रमवारी कशी ठरवली गेली? याबाबत नुकताच खुलासा करण्यात आला.
या नियमाने ठरविण्यात आली क्रमवारी
टोकियो ऑलिम्पिकमध्ये क्रमवारी कशी ठरवायची याचे हक्क आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेकडे असतात. ऑलिम्पिक आयोजित होत असलेल्या शहरात जी बोली भाषा प्रामुख्याने बोलली जाते. त्या भाषेनुसार, ही क्रमवारी लावली जाते. टोकियो शहरात बोलली जाणारी गुजोन भाषा या क्रमवारीसाठी वापरण्यात आली. या भाषाप्रमाणामुळे युएई आणि उझबेकिस्तान यासारखे देश इंग्रजी भाषेप्रमाणे ऑस्ट्रेलिया आणि अल्जरिया यासारख्या देशांच्या आधी संचलनात सहभागी झाले.
उद्घाटन सोहळ्यातील प्रमुख घटना
संचलन सोहळ्यात प्रथेप्रमाणे ग्रीस संघाने सर्वप्रथम मैदानात प्रवेश केला. तर, यजमान जपान सर्वात अखेर स्टेडियममध्ये आले. २०२४ ऑलिम्पिकचे यजमान फ्रान्स व २०२८ ऑलिम्पिकचे यजमान अमेरिका यांनी जपानच्या आधी संचालन केले. जपानची अव्वल टेनिसपटू नाओमी ओसाका हिच्या हस्ते ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित केली गेली.
मेरी कोम व मनप्रीतने केले भारताचे नेतृत्व
उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकातर्फे १२७ खेळाडूंपैकी २६ सदस्य संचलनात सहभागी झाले. भारताच्या पथकाचे ध्वजवाहक म्हणून २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवणारी बॉक्सर मेरी कोम व हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांना संधी मिळाली. इतर सर्व खेळाडूंनी आपआपल्या हातात छोटा-छोटा तिरंगा घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
रहाणे, मंकड यांच्या पंक्तीत बसला सॅमसन; अर्धशतक हुकल्यानंतरही झाला ‘हा’ विक्रम नावावर
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सचिनने केले आचरेकर सरांना वंदन, शेअर केला भावनिक व्हिडिओ
Video: ऑलिम्पिक उद्घाटनात डौलाने फडकला तिरंगा; मेरी कोम आणि मनप्रीतने केले भारताचे नेतृत्व