आज 2019 विश्वचषकात 35 वा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात सामना सुरु आहे. या सामन्यात श्रीलंका प्रथम फलंदाजी करत असताना एक अनोखी गोष्ट पहायला मिळाली आहे. हा सामना मैदानात अनेक मधमाशा आल्याने काही वेळासाठी थांबला होता.
ही घटना श्रीलंका फलंदाजी करत असताना 48 व्या षटकादरम्यान घडली. या षटकातील पाचवा चेंडू ख्रिस मॉरिसने टाकला. पण त्यानंतर मधमाशांचे आक्रमण झाल्याने मैदानावरील पंचांसह श्रीलंकेचे इसरु उडाना आणि सुरंगा लकमल हे दोन्ही फलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेचे सर्व खेळाडू मैदानावरच पालथे झोपले.
या घटनेदरम्यानचा एक फोटो आयसीसीने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. याबरोबर आयसीसीने याआधीही या दोन संघामध्ये झालेल्या एका सामन्यात मधमाशांचे आक्रमण झाले असल्याची आठवण करुन दिली आहे.
Bees two nations have a history!#SLvSA | #CWC19 pic.twitter.com/rEY9T7yhUD
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 28, 2019
याआधी 2017मध्ये जोहान्सबर्गमध्ये 4 फेब्रुवारीला पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघातील वनडे सामन्यात मधमाशांचे आक्रमण झाले होते. त्यावेळी हा सामना जवळ जवळ एक तासासाठी थांबवण्यात आला होता.
तसेच हा सामना दक्षिण आफ्रिका गुलाबी जर्सी घालून खेळत होता. विशेष म्हणजे ज्यावेळी या सामन्यात मधमाशांचे आक्रमण झाले होते त्यावेळीही ख्रिस मॉरिसच गोलंदाजी करत होता.
When last did you see this?
????????Bees stop play, momentarily
The bees are back again in a South Africa v Sri Lanka cricket match, this time at Chester-le-Street#CWC19 #ItsMoreThanCricket #SLvSA pic.twitter.com/Hr6K9b6f0x
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 28, 2019
आज सुरु असलेल्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात सर्वबाद 203 धावा केल्या आहेत आणि दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 50 षटकात 204 धावांचे आव्हान दिले आहे.
श्रीलंकेकडून अविष्का फर्नांन्डो आणि कुशल परेराने सर्वाधिक 30-30 धावांची खेळी केली. तर दक्षिण आफ्रिकेकडून ख्रिस मॉरिस आणि ड्वेन प्रिटोरियसने सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
https://twitter.com/FredBoycott/status/1144594073174650881
There is, no joke, a swarm of bees at the Sri Lanka/SA world cup game and everyone is lying down in subservience to their new insect masters. #CricketWorldCup2019 pic.twitter.com/ZcyoC7ALiz
— Christopher Knaus (@knausc) June 28, 2019
Down but not out! A swamp of bees at Durham hold up play. #SLvsRSA #CWC19 pic.twitter.com/4wkI7KP1sH
— Mel Jones (@meljones_33) June 28, 2019
They're beeeehind you Paul!#SLvSA | #CWC19 pic.twitter.com/GaExiCJXXd
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 28, 2019
Bees stopped play at Chester-le-Street in the South Africa versus Sri Lanka match #CWC19 #SLvSA pic.twitter.com/N6pXqTyhRf
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) June 28, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत; बीसीसीआयने शेअर केला फोटो
–‘सामनावीर’ कोहलीचे नाव सचिन-जयसुर्या सारख्या दिग्गजांच्या यादीत आता सन्मानाने घेतले जाणार
–मोहम्मद शमीने केला नवा विश्वविक्रम; स्टार्क, बोल्टसारख्या गोलंदाजांनाही टाकले मागे






