---Advertisement---

इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघासाठी आली आनंदाची बातमी, वाचा सविस्तर

On: रविवार, मे 23, 2021 1:23 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व इंग्लंड विरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका मिळण्यासाठी २ जून रोजी इंग्लंडला रवाना होईल. सध्या जगभरात कोरोना या गंभीर आजाराचे सावट असल्याने एका देशातून दुसऱ्या देशात गेल्यास प्रवासी नागरिकांना काही दिवस विलगीकरणात वास्तव्य करावे लागत आहे. भारतीय संघाला देखील इंग्लंडमध्ये गेल्यानंतर १० दिवस विलगीकरणात राहावे लागणार होते, मात्र आता भारतीय क्रिकेटपटूंना यामधून सूट मिळाल्याची बातमी समोर येतेय.

भारताचा समावेश रेड लिस्टमध्ये
सध्या भारतात रोज लाखोंच्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे इंग्लंडने भारताचा समावेश रेड लिस्टमध्ये केला आहे. या कारणाने भारतातून कोणीही इंग्लंडला जाऊ शकत नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेटपटूंना इंग्लंडमध्ये येणेबाबत परवानगी मिळवली आहे.

विलगीकरण कालावधीत मिळाली सूट
भारतीय खेळाडू इंग्लंडला गेल्यानंतर त्यांना १० दिवस विलगीकरणात राहावे लागेल, असे इंग्लंड सरकारने म्हटले होते. मात्र, बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला खेळाडूंचा विलगीकरण कालावधी कमी करण्याविषयी सांगितले होते. त्या प्रक्रियेचा भाग म्हणून इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सरकारकडून खेळाडूंना केवळ तीन दिवस विलगीकरणात ठेवण्याची परवानगी मिळवली आहे, असे समोर येत आहे.

भारतीय खेळाडूंची अशी आहे सुविधा
भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना साऊथॅम्टनला पाठवले जाईल. तिथे तीन दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर खेळाडूंना सरावाची मुभा मिळेल. भारत १८ जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. त्यानंतर, ऑगस्ट महिन्यापासून इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका असेल.

भारतीय पुरुष संघाप्रमाणे महिला संघाला देखील या नवीन नियमात सूट मिळणार आहे. भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्ध १ कसोटी, ३ वनडे व ३ टी२० सामने खेळेल. हे सर्व सामने ब्रिस्टल येथे आयोजित केले जाणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

धोनी संघात असल्याने नियमितपणे सामने खेळण्याची संधी मिळत नसे, ‘या’ यष्टीरक्षकाची मोठी प्रतिक्रिया

अरे व्वा! श्रेयस अय्यर पुनरागमनासाठी सज्ज; व्हिडिओ शेअर करत दिले संकेत

दु:खद! माजी भारतीय क्रिकेटपटूच्या आईचे निधन, विराटने केली होती आर्थिक मदत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---