साऊथँम्पटन। मंगळवारी(४ ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्यात आयर्लंडने ७ विकेट्सने विजय मिळवत मालिकेचा शेवट गोड केला. असे असले तरी हा सामना इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनसाठी वैयक्तिकरित्या खास ठरला. त्याने या सामन्यात शानदार शतकी खेळी केली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाकडून मॉर्गनने ८४ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांसह १०६ धावा केल्या. हे मॉर्गनचे इंग्लंडकडून खेळताना वनडेत केलेले १३ वे शतक आहे. विशेष म्हणजे तो या सामन्यात चौथ्या क्रमांकावर चौथ्या षटकात फलंदाजीसाठी आला होता आणि त्याने इंग्लंडच्या डावाच्या २५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याचे शतकही पूर्ण केले होते.
त्यामुळे वनडेमध्ये चौथ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना डावाच्या २५ व्या षटकाच्या आत शतक पूर्ण करणारा मॉर्गन दुसरा फलंदाज ठरला. याआधी न्यूझीलंडचा फलंदाज कोरी अँडरसनने असा पराक्रम केला आहे. त्याने २०१४ ला वेस्ट इंडिजविरुद्ध क्विन्सटाऊन येथे १८ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शतक पूर्ण केले होते. त्यावेळी तो ८ व्या षटकात ५ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.
त्याच सामन्यात त्याने ३६ चेंडूत शतक करण्याचा विक्रम रचला होता. तो सामना पावसामुळे २१-२१ षटकांचा करण्यात आला होता. त्या सामन्यात अँडरसनने ४७ चेंडूत नाबाद १३१ धावांची खेळी केली होती.
मंगळवारी झालेल्या इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघातील तिसऱ्या वनडेत मॉर्गनच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ४९.५ षटकात सर्वबाद ३२८ धावा केल्या होत्या आणि ३२९ धावांचे आव्हान आयर्लंडला दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडकडून सलामीवीर फलंदाज पॉल स्टर्लिंग (१४२ धावा) आणि कर्णधार अँड्र्यू बालबिर्नी (११३ धावा) यांनीही दमदार शतकी खेळी केल्या. त्यामुळे आयर्लंडने ३२९ धावांचे आव्हान ४९.५ षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.
महत्त्वाच्या बातम्या –
कोण होणार आयपीएलचा नवा स्पॉन्सर, बीसीसीआयचं टेन्शन वाढलं
जगातील दोन महत्त्वाच्या क्रिकेट लीग होणार एकाचवेळी, क्रिकेटर वैतागले
एकाच वनडे सामन्यात दोनही कर्णधारांनी ५ वेळा केली आहेत खणखणीत शतकं, कोहलीने तर
ट्रेंडिंग लेख –
अवघे १९ वय असताना वनडे क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा आकीब जावेद
आईच्या मदतीने सुरु झाली होती डिविलियर्सची प्रेमकहानी, भारतातच केले होते प्रपोज
वाढदिवस विशेष: आमीर सोहेलला “पेहली फुरसत से निकल” म्हणणारा वेंकटेश प्रसाद