जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा १८-२२ जूनमध्ये होणार आहे. पूर्ण दोन वर्षांच्या कालावधीनंतर हा अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना रंगणार आहे. इंग्लंडमधील साउथम्प्टनच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. अशात सामन्याची तारीख तोंडावर आली असताना न्यूझीलंडचे खेळाडू मस्ट पार्टीमध्ये रमल्याचे दिसले.
न्यूझीलंड संघ नुकताच इंग्लंड विरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळून साउथम्प्टनमध्ये दाखल झाला आहे. या दोन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने इंग्लंडचा १-० ने पराभव केला आहे. पहिला सामना अनिर्णित ठरल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंड संघाचा ८ विकेट्सने पराभव केला. त्यानंतर त्यांनी साउथम्पटनचा मार्ग धरला.
न्यूझीलंडचे खेळाडू साउथम्प्टनमध्ये आल्यानंतर पार्टी केल्याचे दृश्य बघण्यात आले आहे. न्यूझीलंडच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून हा विडिओ शेअर करण्यात आला आह.. न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज नील वॅग्नर हा शेफ बनून आपल्या खेळाडूंना विविध पदार्थ सर्व्ह करताना दिसत आहे.
न्यूझीलंडच्या संघाने या व्हिडिओच्या खाली लिहिले की, ‘संघाचा साउथम्प्टनमध्ये पहिला दिवस. काही खेळाडू व साहाय्यक कर्मचाऱ्यांना निरोप द्यायचा सर्वात उत्तम उपाय. हेड शेफ नील वॅग्नरने बनवला सर्वांसाठी उत्कृष्ट स्वयंपाक.’ न्यूझीलंडच्या १५ सदस्यीय ताफ्यात जागा न मिळालेले खेळाडू मायदेशी परतण्याच्या तयारीत आहेत. तत्पुर्वी त्यांच्यासाठी ही खास पार्टी आयोजित करण्यात आली आहे.
The perfect way to wrap the team's first full day back in Southampton and farewell the players and support staff returning to New Zealand before the @ICC World Test Championship Final? A BBQ prepared by Head Chef @NeilWagner13 #WTC21 pic.twitter.com/RI17aKw8CW
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 15, 2021
भारतीय संघ – रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड संघ – केन विलियम्सन (कर्णधार), टॉम टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेवन कान्वे, कॉलिन डि ग्रांडहोम, मैट हेनरी, काइल जेमिसन, टॉम लैथम, हेनरी निकोल्स, एजाज पटेल, टीम साउथी, रॉस टेलर, नील वैग्नर, बीजे वॉटलिंग, विल यंग.
महत्वाच्या बातम्या
रोनाल्डोच्या एका व्हिडिओमुळे हंगामा, कोका-कोला कंपनीला २९३ कोटींचे नुकसान
टी२० विश्वचषकापुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, ‘या’ महत्त्वाच्या दौऱ्यातून ७ खेळाडूंची माघार
‘पदार्पणाच्या कसोटीत धमाल करणार,’ धावांचा रतीब घालणाऱ्या सचिनला १७ वर्षीय खेळाडूची भुरळ