नुकताच टी-२० विश्वचषक २०२१ संपला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे. यानंतर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० आणि कसोटी मालिकेचे आयोजन केले गेले आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १९ नोव्हेंबर रोजी टी-२० मालिकेतील दुसरा सामना धोनीच्या घरच्या मैदानावर म्हणजे, रांची स्टेडियमवर खेळला जाणार आहे. अशात धोनीचे या स्टेडियमवर सतत येणे जाणे सुरू आहे. त्याचा व्हायरल झालेला व्हिडिओही याच स्टेडियमवरचा आहे.
टी-२० मालिकेतील दुसरा सामना ज्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे, त्या रांचीच्या स्टेडियमवर सध्या धोनीचे नियमित येणे जाणे होत आहे. धोनी सध्या त्याच्या फिटनेसवर मेहनत घेत आहे. तो स्टेडियमच्या जिममध्ये घाम घाळत आहे. धोनीचा जिममध्ये मेहनत करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते या व्हिडिओवर कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
त्याव्यतिरिक्त धोनीचा अजून एक दुसरा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत धोनी रांची स्टेडियममध्ये प्रवेश करत आहे. पण झारखंडच्या एका १९ वर्षांखालील खेळाडूच्या विनंतीवरुन धोनी मध्येच थांबतो आणि पुढे त्या खेळाडूच्या बॅटवर स्वाक्षरी देताना दिसतो आहे.
Recent video of MS Dhoni at JSCA giving his autograph to Jharkhand U19 players! 😍❤️
🎥 : Kushmahi7 #MSDhoni • #WhistlePodu pic.twitter.com/mr6l2JXnjS
— Nithish MSDian 🦁 (@thebrainofmsd) November 14, 2021
टी-२० विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांच्या पदरी निराशा आली आहे. आता याच पार्श्वभूमीवर आगामी मालिकेत दोन्ही संघ चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतील. एमएस धोनी टी-२० विश्वचषकादरम्यान भारतीय संघाचा मेंटॉर होता, पण त्याच्या मार्गर्दशनातही संघाला काही खास कामगिरी करता आली नाही. भारत यावर्षी विश्वचषकाच्या पहिल्या चार संघांमध्येही स्थान बनवू शकला नाही.
तसेच संघाला विश्वचषकात पहिल्यांदाज पाकिस्तानकडून पराभव मिळाला आहे. पाकिस्तानने भारताला तब्बल १० विकेट्स राखून मात दिली होती. असे असले तरी धोनीच्या नेतृत्वात त्याची आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जने मात्र यावर्षी उत्तम प्रदर्शन केले आणि आयपीएलचे जेतेपद पटकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत दौऱ्यावर आलेला न्यूझीलंड संघ राहणार नाही क्वारंटाईन, ‘हे’ आहे कारण