भारतीय संघाचे माजी दिग्गज नवजोत सिंग सिद्धू मोठ्या काळानंतर क्रिकेटच्या मैदानात समालोचन करताना दिसणार आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये नवजोत सिंग सुद्ध क्रिकेटपासून दूर होते. राजकारणात हात आजमावल्यानंतर माजी क्रिकेटपटू पुन्हा एकदा समालोजन करताना दिसणार आहे. पत्नीच्या आजारपणामुळे सिंद्धूंनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी आयपीएल हंगामात ते पुन्हा एकदा आपल्या आवाजाने चाहत्यांचा रोमांच वाढवणार आहेत. तत्पूर्वी सिद्धूंनी भारतीय दिग्गज विराट कोहली याच्याविषयी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
नवजोत सिंग सुद्धू (navjot sidhu) याने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत नुकतेच सांगितले की, “मला वाटते विराट कोहली भारताचा सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे.” माजी भारतीय क्रिकेटपटूला पुढे असा प्रश्न विचारला गेला की, आयपीएलमध्ये विराट तिसऱ्या क्रमांकावर खेळला पाहिजे का? अनेकांच्या मते भारतासाठी आगामी टी-20 विश्वचषकात त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागणार आहे. अशात विराट आयपीएलमध्येही विराट तिसऱ्याच क्रमांकावर खेळला पाहिजे. पण नवजोत सिंग सिद्धू यांना असे वाटत नाही. सिद्धू म्हणाला, “कोहलीने आरसीबीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे. कारण संघाची हीच गरज आहे.”
सुद्धू म्हणाला की, “मला असे वाटत नाही. विराट तेच करतोय, जी संघाची मागणी आहे. तुम्ही जगातील सर्वात महान खेळाडू असाल, जो विराट आहे. पण तुमचा संघ जिंकत नसेल, खासकरून जेव्हा तुमचा संघ एकदाही ट्रॉफी जिंकत नसेल. तर हा तुमच्या नावापुढे लागलेला एक ठपका आहे. हा ठपका तुम्ही पुसला पाहिजे.”
“मी त्याला भारताचा सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून रेट केले आहे. अशीही वेळ होती की, जेव्हा मी माझा ट्रांजिस्टर लावायचो आणि सुनील गावसकरांना वेस्ट इंडीजविरुद्ध फलंदाजी करताना ऐकायचो. ते 70 चे दशक होते. वेस्ट इंडीजचे महान वेगवान गोलंदाज, शाला बुडवून एका तासासाठी बाहेर जायचे आणि ते कशा पद्धथीने हेलमेट न घालता फलंदाजी करत आहेत, ते ऐकणे. तो त्यांचा काळ होता. सुमार 15-20 वर्ष त्यांचा दबदबा राहिला. नंतर टेंडुलकर आला आणि नवीन युवाची सुरुवात झाली. त्यानंतर एमएस धोनी आणि नंतर विराट कोहली आला. जर तुम्ही या चारही खेळाडूंवर जर टाकली, तर मी त्याला (विराट) सर्वश्रेष्ठ मानेल. कारण त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये धावा केल्या आहेत. त्याचसोबत त्याची खेळण्याची शैली आणि फिटनेसच्या बाबतीत देखील इतरांपेक्षा तो पुढे आहे.”
दरम्यान, आयपीएल 2022 हंगामाची सुरुवात शुक्रवारी (22 मार्च) होणार आहे. लीगचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जाणार आहे. (Before resuming the commentary, Navjot Singh Siddha’s blunt statement, Virat Kohli heavier than Sachin Tendulkar?)
महत्वाच्या बातम्या –
“७०व्या वरिष्ठ पुरुष गट कबड्डी” स्पर्धेकरिता अहमदनगरचे वाडिया पार्क सज्ज! महाराष्ट्राच्या कामगिरीकडे सर्व कबड्डीप्रेमींचे लक्ष
IPL 2024चे सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार? घ्या जाणून सविस्तर