बीसीसीआयने आगामी श्रीलंकेदाैऱ्यासाठी भारतीय संघाची गुरुवारी (18 जुलै) रोजी घोषण केली. वास्तविक, टीम इंडियीच्या हेड कोच पदी निवड झाल्यानंतर गाैतम गंभीरचा हा पहिलाच दाैरा होणार आहे. भारतीय संघ 27 जुलै पासून या दाैऱ्याला सुरुवात करेल. ज्यामध्ये संघाला 3 टी20 आणि तेवढेच एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. ज्यासाठी टीम इंडियाची आधीच घोषणा करण्यात आली होती. दरम्यान या दाैऱ्यासाठी शानदार फाॅर्म मध्ये ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा या दोघांना संघातून वगळण्यात आले.
आश्या परिस्थितीत. झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी केलेल्या ऋतुराज गायकवाड आणि पदार्पणाच्या मालिकेत शतक ठोकलेल्या अभिषेक शर्माला संघातून का वगळण्यात आले? असा प्रश्न सर्वत्र निर्माण होत आहे. आता या प्रश्नवर निवडकर्ता अजित अगरकरने स्पष्टीकरण दिले आहे.
श्रीलंका दाैऱ्यापूर्वी होत असलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ऋतुराज आणि अभिषेक शर्मा संघाबाहेर केल्याबद्द विचारले असता, अगरकर म्हणाले “कोणत्याही खेळाडूला संघात निवडले नाही तर त्यांना वाटेल की त्यांना खूप वाईट वागणूक दिली गेली आहे. रिंकूकडे पहा, त्याने टी-20 विश्वचषकापूर्वी खरोखरच चांगली कामगिरी केली होती पण त्याची निवड झाली नाही. आम्ही फक्त 15 खेळाडू निवडू शकतो.”
श्रीलंका दाैऱ्यासाठी भारतीय संघ-
भारतीय टी20 संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी नेहमीच त्याचा चाहता असेन’, टीम इंडियाच्या माजी कर्णधारासाठी शिवम दुबे स्पष्टच बोलला..
IND vs SL: हेड कोच गाैतम गंभीरची पत्रकार परिषद पाहता येणार लाइव्ह, पाहा संपूर्ण अपडेट एक क्लिकवर
ENG vs WI: 20 वर्षीय गोलंदाजापुढे वेस्ट इंडिजची शरणागती! इंग्लंडने केले 241 धावांनी पाहुण्या संघाचा पराभव