आशिया चषक स्पर्धेत शुक्रवारी (2 ऑगस्ट) हाँगकाँग संघ आमने सामने येतील. उभय संघातील हा सामना शारजाहमध्ये खेळला जाणार आहे. हाँगकाँगने आशिया चषकातील पहिल्या सामन्यात भारताला चांगले आव्हान दिले होते. मात्र, भारताने हा सामना 40 धावांनी जिंकला. शुक्रवारी त्यांच्याकडे आशिया चषकातील सुपर फोर फेरीत जागा पक्की करण्यासाठी संधी आहे, पण यासाठी त्यांना पाकिस्तानला पराभूत करावे लागेल. तत्पूर्वी पाकिस्तान आणि हाँगकाँग संघाच्या कर्णधारांमध्ये भेट झाली. पीसीबीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बाबर आझम विरोधी संघाच्या कर्णधाराला सल्ला देताना दिसत आहे.
सामन्यापूर्वी हाँगकाँगचा कर्णधार निजाकत खान (Nizakat Khan) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यांची भेठ झाली. या दोघांच्या भेटीदरम्यानचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला आहे. व्हिडिओत निजाकत असे बोलताना दिसत आहे की, “काही सल्ले आम्हालाही द्या.” बाबरने देखील विरोधी संघाच्या कर्णधाराची निराशा केली नाही. त्याने निजाकताल स्वतःवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला.
https://www.instagram.com/p/Ch9_n8NN5iS/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा पाकिस्तान आणि हाँगकाँग संघ टी-20 फॉरमॉटमध्ये एकमेकांसमोर असतील. यापूर्वी तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये हे दोन्ही संघ आमने सामने आले आहेत आणि प्रत्येक वेळी पाकिस्तानने विजय मिळवला आहे. हाँगकाँगचा संघ पाकिस्तानच्या तुलनेत दुबळा म्हणता येऊ शकतो. त्यांच्या संघातील जवळपास सर्व खेळाडू दुसऱ्या देशांमधील आहेत. मुळचे पाकिस्तानचे असलेले पाच खेळाडू सध्या हाँगकाँगचे प्रतिनिधित्व करत आहेत.
आशिया चषकासाठी क्लालिफाय करण्यासाठी हाँगकाँगने यूएई आणि सिांगपूर संघांना मात दिली होती. आशिया चषकातील पहिल्या सामन्यात हाँगकाँगने भारताविरुद्ध 152 धावा केल्या होत्या. त्यांचा कर्णधार निजाकत खान बाबर आझमचा मोठा चाहता आहे. तसेच भारताचा माजी कर्णधार विराट कोहली देखील त्याच्यासाठी एक आदर्श आहे. एका मुलाखतीत निजाकतने पाकिस्तानविरुद्ध चांगले प्रदर्शन करू, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
नशीब बलवत्तर! श्रीलंकेच्या मेंडिसला 5 वेळा जीवनदान, मग थेट अर्धशतक करत ठरला मॅच विनर
चोरीचा मामला.. बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेची चिटिंग? ड्रेसिंग रूममध्ये पाठवण्यात आले सिक्रेट कोड
हिशोब बरोबर! 4 वर्षांपूर्वीचा सूड पूर्ण करत श्रीलंकेच्या खेळाडूंचा नागिन डान्स, सेलिब्रेशनची सर्वत्र चर्चा