भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना मोहालीमध्ये खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारताने एक डाव आणि २२२ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयानंतर उभय संघातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना १२ मार्चपासून बेंगलोरमध्ये खेळला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघात एक मोठा बदल घडला आहे. भारताच्या कसोटी संघात अष्टपैलू अक्षर पटेलचे पुनरागमन झाले आहे.
अक्षर पटेल (axar patel) मागच्या काही काळापासून दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. आता तो दुखापतीतून सावरला आहे आणि संघात पुनरागमन केले आहे. अक्षरच्या जागी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला संधी मिळाली होती, पण आता अक्षरचे पुनरागमन झाल्यानंतर त्याला संघातून बाहेर जावे लागले.
क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार अक्षर पटेल दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे आणि संघासोबत सामील झाला आहे. माहितीनुसार अक्षर मोहालीमध्ये कसोटी सामना सुरू असतानाचा संघासोबत जोडला गेला आहे. कुलदीपला आता संघातून रिलीज केले गेले आहे. संघ व्यवस्थापनाच्या मते आता संघात दोन डावखुरे फिरकी गोलंदाज झाले आहेत, अशात कुलदीपची गरज उरलेली नाही. १८ सदस्यीय संघात रविचंद्रन अश्विन आणि जयंत यादव या फिरकी गोलंदाजांचाही समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर आला होता. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा एक कसोटी सामना मुंबईत खेळला होता. हा सामना अक्षरने खेळलेला शेवटचा कसोटी सामना होता. तेव्हापासून तू दुखापीवर काम करत होता आणि संघातून बाहेर होता. आता बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यातून तो संघात पुनरामगन करेल. हा सामना डे-नाइट असणार आहे, ज्यामध्ये गुलाबी चेंडू वापरला जाईल.
भारतीय टेस्ट स्क्वॉड :
रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाल, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
महत्वाच्या बातम्या –
‘जडेजाला धावांची भूक, जे संघहिताचेच’, कर्णधार रोहितने कौतुकाने थोपटली पाठ
‘मोहाली कसोटी जडेजासाठी ओळखली जाईल’, भारताच्या मोठ्या विजयानंतर माजी क्रिकेटरची स्तुतीसुमने
कपिल देवचा विक्रम मोडल्यानंतर आर अश्विन भावुक; म्हणाला, ‘मी क्रिकेटचा आभारी, मला कधीच वाटले…’