हार्दिक पंड्या इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असेल. आयपीएल 2024च्या लिलावाच्या ठीक आधी हार्दिकने पुन्हा एकदा मुंबईचा हात हातात धरला. यासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये मोठी कॅश-डील झाली, अशाही चर्चा समोर आल्या. आगामी हंगामात घरवापसी करणाऱ्या हार्दिकचे प्रदर्शन कसे असणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 22 मार्च रोजी आयपीएलचा आगामी हंगाम सुरू होणार आहे. तत्पूर्वी हार्दिकची खास प्रतिक्रिया समोर आली.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने आयपीएल 2015 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पहिला आयपीएल सामना खेळला. सुरुवातीच्या काही आयपीएल हंगामांमध्ये त्याने आपली वेगळी ओळख तयार केली. 2016 साली त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मागच्या काही वर्षांपासून हार्दिक भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू राहिला आहे. आगामी आयपीएल हंगामात तो मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. पण याच मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 पूर्वी त्याला रिलीज केले होते. गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 साठी 15 कोटी रुपयांमध्ये हार्दिक पंड्याला खरेदी केले होते.
गुजरात टायन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ आयपीएल 2022 मध्ये नव्याने अस्थित्वात आले. पहिल्याच आयपीएल हंगामात गुजरात टायटन्सने हार्दिकच्या नेतृत्वात विजेतेपद पटकावले. पुढे 2023 मध्ये हार्दिकने गुजरातला उपविजेतेपदापर्यंत पोहोचवले. पण आयपीएल 2024 साठी हार्दिक पुन्हा मुंबईच्या ताफ्यात सामील झाला. रोहित शर्मा याच्याकडे असलेले कर्णधारपद आता हार्दिककडे सोपवण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी आता हार्दिकच्या खांद्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने संघ यावर्षी जबरदस्त प्रदर्शन करणार असे संकेत दिले आहेत.
आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सराव करत आहे. फ्रँचायझीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात हार्दिक म्हणतो, “मुंबई इंडियन्सची जर्सी पुन्हा घालणे माझ्यासाठी खूप खास गोष्ट आहे. अम्ही असे दर्जेदार क्रिकेट खेळू की, प्रत्येकाला हा प्रवास पाहून अभिमान वाटेल. आणचा विजय कोणीच विसरणार नाही.”
“My journey started here. Coming back home & playing is always going to be special.” – @hardikpandya7💙#OneFamily #MumbaiIndians pic.twitter.com/GrtVmjl7Xd
— Mumbai Indians (@mipaltan) March 15, 2024
दरम्यान, आयपीएलच्या आगामी हंगामात मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना 24 मार्च रोजी गुजरात टायटन्स संघासोबत खेळेल. आयपीएलचा हा हंगाम यंदा दोन भागांमध्ये खेळला जाईल. पहिला भाग 22 ते 7 एप्रिल यादरम्यान एकूण 21 सामन्यांचा असेल. मुंबईला यात एकूण 4 सामने खेळायचे आहेत. (Before the start of IPL 2024, Hardik Pandya has given a suggestive reaction)
महत्वाच्या बातम्या –
कधी पंचांशी वाद घालतो तर कधी चाहत्याला थप्पड मारतो, क्रिकेटचा ‘बॅड बॉय’ शाकिब अल हसन
IPL 2024 : आयपीएलपूर्वी जोफ्रा आर्चरने त्याच्याच संघाविरुद्ध खेळून बंगळुरूमध्ये दाखवली क्षमता, अन् घेतल्या इतक्या विकेट्स