---Advertisement---

व्हिडिओ : विवादित झेलामुळे स्टोक्स होतोय ट्रोल, चाहत्यांनी केली पॉंटिंगशी तुलना

---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेचा तिसरा सामना बुधवारपासून (२४ फेब्रुवारी) सुरु झाला आहे. हा सामना दिवस-रात्र सामना आहे. हा सामना पुर्नबांधणी करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) होत आहे. इंग्लंडचा संघ आपल्या पहिल्या डावात ११२ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला देखील सुरुवातीला दोन धक्के बसले. मात्र, रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरला. त्याचवेळी, भारताची फलंदाजी सुरू असताना इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स एका विवादीत दुर्घटनेमुळे चांगलाच ट्रोल होत आहे.

अशी घडली घटना

भारतीय संघ आपल्या पहिल्या डावात फलंदाजी उतरल्यानंतर इंग्लंडसाठी अनुभवी जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी गोलंदाजीची सुरुवात केली. ब्रॉडने टाकलेल्या दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू भारताचा सलामीवीर शुबमन गिलच्या बॅटची कड घेत स्लीपमध्ये गेला. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टोक्सने तो झेल घेतल्याचे अपील केले. मात्र, पंचांनी तात्काळ बाद न ठरवता तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. तिसऱ्या पंचांनी हा झेल नसून एक टप्पा पडत चेंडू स्टोक्सच्या हातात गेल्याचे स्पष्ट केलं. तिसऱ्या पंचांच्या निर्णयांमुळे इंग्लंडचे सर्व खेळाडू नाराज झाले व त्यांनी पंचांकडे याबाबत विचारणा केली.

चाहत्यांनी धरले धारेवर
स्पष्टपणे झेल घेतला नसतानाही झेल घेतल्याचे अपील केल्याने चाहत्यांनी बेन स्टोक्स व इंग्लंडच्या खेळाडूंना सोशल मीडियावरून ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका चाहत्याने ट्विट करत लिहिले, “२००८ सिडनी क्रिकेट ग्राउंड, रिकी पॉंटिंग काही आठवलं का?” अन्य एका चाहत्याने लिहिले की, “तुम्हाला वाटत असेल की आणखी काही अँगलने पाहता आले असते. मात्र, एकाच अँगलमुळे निर्णय होत असेल तर वेळ का वाया घालवायचा?”

भारताचे माजी कसोटीपटू व सध्या समालोचन करणारे संजय मांजरेकर यांनी देखील या घटनेविषयी ट्विट करताना म्हटले, “माझ्या मते पंचांनी घाई केली. पंचांनी सॉफ्ट सिग्नल बाद दिला होता नंतर तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद ठरवले. माझ्या मते हा योग्य निर्णय होता. निर्णय बदलण्यासाठी पुरावे पुरेसे होते.”

इंग्लंडची झाली वाताहात
भारताच्या फिरकीपटूंनी पाहुण्या इंग्लंड संघाला पहिल्या दिवसाच्या दोन सत्रांआधीच ११२ धावांवर सर्वबाद केले. भारताकडून अक्षर पटेलने ६ तर अनुभवी रविचंद्रन अश्विनने तीन गडी बाद केले. आपला शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या इशांत शर्माला एक गडी बाद करण्यात यश लाभले.

महत्वाच्या बातम्या:

INDvsENG 3rd Test Live: भारताला दुहेरी झटका, शुबमन गिल-चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी

भारतीय महिला संघ मैदानावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज; या संघाविरुद्ध मायदेशात खेळणार मालिका

शंभरावा सामना खेळणाऱ्या इशांत शर्माचे टीम इंडियाने असे केले मैदानात स्वागत, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---