भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात शुक्रवारी (२६ मार्च) गहुंजे स्टेडियम, पुणे येथे झालेला दुसरा वनडे सामना अतिशय रोमांचक ठरला. इंग्लंडचे फलंदाज जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी भारतीय गोलंदाजांनी पिसे काढली. त्यांच्या अफलातून खेळीच्या जोरावर इंग्लंडने ६ विकेट्स राखून भारतावर मात केली. याबरोबरच १-१ ने मालिकेत बरोबरीही साधली. दरम्यान स्टोक्सचे वनडे शतक अवघ्या एका धावेने हुकले. त्यानंतर तो भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ३३६ धावांचा डोंगर उभारला होता. भारताच्या या ३३७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी धमाकेदार सुरुवात केली. जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो या सलामी जोडीने पंधराव्या षटकापर्यंत शतकी भागिदारी पूर्ण केली. अखेर सोळाव्या षटकात रोहित शर्मा आणि रिषभ पंतने मिळून जेसनला धावबाद करत त्यांची भागिदारी मोडली.
त्यानंतर स्टोक्स तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. सुरुवातीला बचावात्मक खेळी करत तो मैदानावर स्थिरावला. पुढे आक्रमक पवित्रा घेत षटकार-चौकारांच्या आतिषबाजीसह त्याने शतकाच्या नजीक धावा केल्या. मात्र ३५.२ षटकात भुवनेश्वर कुमारने रिषभ पंतच्या हातून त्याला झेलबाद केले. त्यामुळे ५२ चेंडूत १० षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने तो ९९ धावा करत तंबूत परतला.
अवघ्या एका धावेने शतक हुकल्यानंतर स्टोक्स भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याने पव्हेलियनला जाताना आकाशाकडे पाहिले आणि आपल्या दिवंगत बापाला ‘सॉरी’ म्हटले.
https://twitter.com/anubhav__tweets/status/1375467170608467975?s=20
https://twitter.com/KolarPeace/status/1375470546259873792?s=20
https://www.instagram.com/p/CM4v4eer2dS/?utm_source=ig_web_button_share_sheet
कॅन्सरमुळे गमावले वडिलांनी प्राण
बेन स्टोक्सचे वडील गेड यांचे गतवर्षी कॅन्सरमुळे निधन झाले होते. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिका चालू असताना गेड कॅन्सरशी लढा देत होते. न्यूझीलंडमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. या कारणाने स्टोक्सने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून माघारही घेतली होती. अखेर ८ डिसेंबर २०२० रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
महत्त्वाच्या बातम्या-
INdvENG: ‘त्या’ नियमांमुळे निर्माण झाला वाद, आता स्वत: आयसीसीचं करणार आपल्या नियमांत बदल
धू धू धुतलं! स्टोक्सने ५२ चेंडूत ठोकले १० खणखणीत षटकार, ‘या’ फलंदाजांची केली बरोबरी