---Advertisement---

भर सामन्यात बेन स्टोक्सकडून घडले असे काही; रूटलाही आवरले नाही हसू

On: गुरूवार, जुलै 30, 2020 1:15 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघात ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पार पडला. तो सामना इंग्लंड संघाने २६९ धावांनी जिंकत मालिका खिशात घातली. या सामन्यादरम्यान इंग्लंड संघाचा अष्टपैलू बेन स्टोक्सबरोबर असे काही घडले, जे पाहून कर्णधार जो रूटही आपले हसू रोखू शकला नाही.

खरंतर सामन्यादरम्यान स्टोक्सच्या पँटवरील अशा ठिकाणी डाग लागला होता, जो लपविण्यासाठी तो आपला स्वेटर खाली खेचताना दिसला. या मालिकेच्या सुरुवातीपासून स्टोक्स चर्चेचा विषय ठरला होता. पहिल्या कसोटी सामन्यात रूटच्या अनुपस्थितीत स्टोक्सने प्रभारी कर्णधारपद सांभाळले, तर दुसऱ्या कसोटीत आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने इंग्लंडला विजय मिळवून दिला तसेच ‘सामनावीर’ पुरस्कारही मिळविला.

दुसऱ्या कसोटीत स्टोक्सने एकूण २५४ धावा केल्या तसेच ३ विकेट्सही घेतल्या होत्या. याबरोबरच इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत स्टोक्सला फलंदाजीत चांगली कामगिरी करता आली नाही. परंतु क्षेत्ररक्षणादरम्यान असे काही झाले की, त्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी स्टोक्सच्या पँटवर तपकिरी रंगाचा डाग दिसला. हा डाग अशा जागेवर होता त्यामुळे स्वत: स्टोक्सही जरा अस्वस्थ दिसला. स्लिपमध्ये उभा असणाऱ्या रूटसोबत तो क्षेत्ररक्षण करत होता आणि रूट (Joe Root) त्याला पाहून जोरजोरात हसत होता.

यानंतर स्टोक्स (Ben Stokes) मजेत स्वेटर खाली ओढत तो डाग लपविताना दिसला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात टिपली गेली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला. स्टोक्सने नंतर सांगितले की, तो चूकुन सांडलेल्या कॉफीवर बसला होता. त्यामुळे तो डाग लागला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-इंग्लंडने वेस्ट इंडीजचा पराभव केल्यानंतर जेसन होल्डरने यासाठी भारताकडे मागितली मदत

-झाडावर बसून ‘चिल’ करणारा विराट पाहिलाय का? पाहून व्हाल चकित…

-वर्ल्डकपसाठी बोट कापायलाही तयार झालेला जेकब ओरम

ट्रेंडिंग लेख-

-या ४ संघांना भारताने सर्वाधिक वनडे सामन्यात केले पराभूत

-क्रिकेटमधील ३ अशा घटना, जेव्हा सौरव गांगुलीने केली ‘दादागिरी’

-टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ६: ब्रेंडन मॅक्यूलमने भारताविरुद्ध केलेले झकास त्रिशतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---