---Advertisement---

इंग्लंडला मिळाला रुटचा वारसदार; बेन स्टोक्स बनला नवा कसोटी कर्णधार

On: गुरूवार, एप्रिल 28, 2022 3:41 PM
BEN-STOKES
---Advertisement---

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स याला नवा कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. काहीदिवसांपूर्वीच जो रुटने इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोडले होते. त्यानंतर इंग्लंड संघाच्या कसोटी कर्णधारपदासाठी स्टोक्सचे नाव आघाडीवर होते. अखेर गुरुवारी (२८ एप्रिल) इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याच्या नावावर नवा नियमित कसोटी कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे.

स्टोक्स (Ben Stokes) इंग्लंडचा ८१ वा नियमित कसोटी कर्णधार (England Test Captain) बनला आहे. त्याच्या नियुक्तीसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी मंगळवारी संध्याकाळी मान्यता दिली. त्याच्या नावासाठी इंग्लंड पुरुष क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक, रॉब की यांनी शिफारस केली होती.

स्टोक्सने मानले रुटचे आभार
इंग्लंड क्रिकेट संघाचे कसोटी कर्णधारपद स्विकारल्यानंतर स्टोक्स म्हणाला, ‘इंग्लंड कसोटी संघाच्या कसोटी संघाचे नेतृत्व मिळाल्याचा अभिमान वाटत आहे. हा खरंच विशेषाधिकार आहे आणि मी या उन्हाळी हंगामापासून या जबाबदारी घेण्यास उत्सुक आहे. मी जो रुटला त्याने इंग्लंड क्रिकेटसाठी जे काही केले आहे, त्याबद्दल धन्यवाद म्हणतो. तो नेहमीच जगासाठी खेळाचा ब्रँड अँबेसेडर राहिला आहे. मी कर्णधार म्हणून विकसित होण्यासाठी त्याने ड्रेसिंग रुममध्ये मोठे योगदान दिले आहे आणि यापुढेही या भूमिकेसाठी त्याची मदत महत्त्वाची असणार आहे.’

स्टोक्सने २०१३ साली कसोटीमध्ये पदार्पण केले होते. तसेच त्याची फेब्रुवारी २०१७ साली कसोटी उपकर्णधारपदी नियुक्तीही करण्यात आली होती. त्याने आत्तापर्यंत ७९ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने यात ३५.८९ च्या सरासरीने ५०६१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर १७४ विकेट्स घेतल्या आहेत.

पाकिस्तानविरुद्ध मिळाला विजय
मागील वर्षी पाकिस्तानविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळताना बेन स्टोक्सला इंग्लंड संघाचा कर्णधार बनवले होते. त्यावेळी संघाचे अधिकतर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे खेळण्यासाठी फिट नव्हते. त्यावेळी संघाने मालिका ३-०ने खिशात घातली होती. त्याने २०२०मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एका कसोटी सामन्यातही कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र, इंग्लंडला या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, त्याने जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्यासोबत गोलंदाजी करत आपला ठसा उमटवला होता.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

सहा चेंडूत ४१६च्या स्ट्राईक रेटने २५ धावा कुटणारा हैदराबादचा पठ्ठ्या, जाणून घ्या त्याच्याबद्दल

दिल्लीचा सामना पाहून चिडलेला पाँटिंग, ३-४ रिमोटही तोडले होते, स्वत:च केलाय खुलासा

मॅक्सवेलच्या लग्नाची पार्टी अन् आख्खा बेंगलोर संघ वऱ्हाडी! विराटनेही टीममेट्सबरोबर लावले ठुमके

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---