भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा १५ वा हंगाम सुरू आहे. गेल्या २ वर्षात कोरोनामुळे बदललेल्या परिस्थितीमुळे आयपीएल देखील बायोबबलमध्ये खेळवली जात आहे. त्यामुळे खेळाडू या बायोबबलमध्ये राहूनच वेगवेगळ्या सणांना, कार्यक्रमांचा आनंद घेताना दिसत आहेत. नुकतेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघातही असाच प्रकार पाहायला मिळाला. त्यातच बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली याच्या डान्सचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
मॅक्सवेलच्या लग्नाची पार्टी
गेल्या महिन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या विनी रमण हिच्याशी लग्नगाठ बांधली. त्याचनिमित्ताने बेंगलोर संघात पार्टी करण्यात आली होती. लग्नामुळे मॅक्सवेल आयपीएल २०२२ च्या पहिल्या काही सामन्यांना मुकलाही होता. आता त्याच्या लग्नानिमित्त बेंगलोर संघाने मोठ्या जल्लोषात पार्टी केली (Glenn Maxwell’s wedding ceremony).
या पार्टीदरम्यान संघातील खेळाडू भारतीय पारंपारिक वेषात दिसून आले होते. बेंगलोर संघातील पुरष सदस्यांनी कुर्ता-पायजमा घातल्याचे दिसले होते, तर महिला सदस्यांनी साडी नेसल्याचे दिसले. या पार्टीदरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
विराटच्या डान्सची चर्चा
विराटने या पार्टीमध्ये जोरदार डान्सही (Virat Kohli dance) केला. तो शाहबाज अहमदसह अन्य संघसहकाऱ्यांबरोबर डान्स करताना दिसला आहे. त्याच्या डान्सचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत असून विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत. या पार्टीसाठी त्याच्याबरोबर अनुष्काही उपस्थित होती.
https://twitter.com/cipher_thought/status/1519399402846097409
काहीदिवसांपूर्वी चेन्नईनेही केली होती कॉनवेची प्री-वेडींग पार्टी
बेंगलोरच नाही, तर काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या संघानेही डेवॉन कॉनवेसाठी प्री-वेडिंग पार्टी केली होती. यावेळी संघातील खेळाडू आणि सदस्य पारंपारिक दाक्षिणात्य वेशभूषेत दिसले होते. या पार्टीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते.
Now showing – Kim & Conway Wedding Cassette ????!
???????? https://t.co/oYBPQHs25f!#WeddingWhistles #Yellove ???????? pic.twitter.com/pTLdQgTa5n— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 19, 2022
मॅक्सवेल-विनीचे दोन पद्धतीने लग्न
मॅक्सवेलने विनीबरोबर १८ मार्च रोजी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते. त्यानंतर १० दिवसांनी त्यांनी भारतीय पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो विनीने सोशल मीडियावर शेअर केले होते. लग्नापूर्वी २०२० मध्ये या दोघांनी भारतीय पद्धतीने साखरपूडाही केला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
राशिद खानचा दिसला ‘फिनिशर’ अंदाज! अखेरच्या षटकात ३ सिक्ससह केली धोनीची बरोबरी
‘गप्प बस वडा पाव, एक मॅच तर जिंकत नाही तुझ्याकडून’, चाहते का करतायेत रोहित शर्माला ट्रोल?
मूर्ती लहान, कीर्ती महान! आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात ‘अशी’ कामगिरी करणारा उमरान बनला दुसरा खेळाडू