---Advertisement---

स्टोक्सने स्वत:च्याच पायावर मारलेली कुऱ्हाड, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झालेला विचित्र पद्धतीने बाद

On: मंगळवार, जुलै 19, 2022 12:24 PM
Ben-Stokes
---Advertisement---

इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू आणि कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने सोमवारी (१८ जुलै) मोठी घोषणा केली. मंगळवारी (१९ जुलै) दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना खेळल्यानंतर स्टोक्स एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. त्याने इंग्लंड संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये दिलेले योगदान खूपच महत्वपूर्ण राहिले आहे. दरम्यान त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकटमध्ये अनेक अनोखे विक्रमही आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध  2015 मध्ये  खेळलेल्या एका एकदिवसीय सामन्यात त्याने विचित्र पद्धतीने विकेट गमावली होती.

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला १-२ अशा अंतराने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर स्टोक्सने हा निर्णय घेतला आहे. इंग्लंडला एकदिवसीय विश्वचषक २०१९ ची ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी बेन स्टोक्स (Ben Stokes) याची भूमिका महत्वाची राहिलेली. अंतिम सामन्यात स्टोक्से सर्वाधिक ८४ धावांची खेळी केली होती. स्टोक्सच्या या खेळीमुळेच इंग्लंडला त्यांच्या पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकता आला होता.

इंग्लंडच्या या ३१ वर्षीय दिग्गजाच्या नावावर तसे पाहिले तर अनेक वेगवेगळे विक्रम आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणात बाधा (अब्स्ट्रक्टिंग द फिल्ड) आणल्यामुळे बाद होणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंपैकी स्टोक्स एक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१५ मध्ये खेळल्या गेलेल्या एका सामन्यात त्याने ही नकोशी कामगिरी केली होती.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना ५ सप्टेंबर २०१५ साली ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियवर खेळला गेला होता. स्टोक्स स्ट्राईकवर असताना त्याने एक शॉट खेळला होता, जो थेट गोलंदाजी करणाऱ्या मिचेल स्टार्कच्या हातात गेला होता. स्टोक क्रिज सोडून पुढे आला असल्यामुळे स्टार्कने हा चेंडू स्टंपच्या दिशेन फेकला. पण स्टोक्सने स्वतःची विकेट वाचवण्यासाठी हात मध्ये घालून चेंडू रोखला होता.

खेळपट्टीवर झालेला या प्रकारामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी पंचांकडे अपील केली. खेळाडूंनी विकेटसाठी अपील केल्यानंतर तिसऱ्या पंचांनी स्टोक्सला बाद घोषित केले होते. पंचांना हा निर्णय अब्स्ट्रक्टिंग द फिल्ड नियमाच्या आधारे दिला होता. या नियामाच्या पार्श्वभूमीवर बाद झालेला पंत तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातवा खेळाडू होता. सध्या अशा प्रकारे एकूण १० खेळाडू बाद झाले आहेत.

स्टोक्सच्या एखदिवसीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने एकूण १०४ एकदिवसीय सामने खेलले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण २९१९ धावा केल्या आणि गोलंदाजीत ७४ विकेट्स घेतल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

भारीच ना! जे सचिन-धोनीलाही जमले नाही, ते रिषभ पंतने करून दाखवले, चाहत्यांकडून इंग्लंडमध्ये खास सत्कार

काय सांगता! विश्वचषकातील सुपर ओव्हरपूर्वी बेन स्टोक्स गेला होता सिगारेट प्यायला

विराट अवलंबणार ‘बॅक टू बेसिक्स’ मंत्र? खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी होणार मदत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---