मागच्या काही दिवसांपासून बेन स्टोक्स वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार, अशा चर्चा सुरू होत्या. बुधवारी (16 ऑगस्ट) स्टोक्सने अखेर अधिकृतपणे आपली वनडे निवृत्ती मागे घेतली. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मलिकेसेठी स्टोक्सला इंग्लंडच्या वनडे संघात सामील करण्यात आले आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात 30 ऑगस्टपासून टी-20 मालिका खेळली जाणार आहे. चार सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर उभय संघांमध्ये चार सामन्यांची वनडे मालिका 8 सप्टेंबर रोजी सुरू होईल. या वनडे मालिकेसाठी बेन स्टोक्स (Ben Stokes) याची इंग्लंड संघात निवड केली गेली आहे. स्टोक्सने मागच्या वर्षी वर्कलोडमुळे वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली होती. पण आता आगामी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. वनडे संघा स्टोक्स परतल्याने हॅरी ब्रुक (Harry Brook) याला मात्र आपली जागा गमवावी लागली.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1691740228623671443?s=20
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी इंग्लंड संघ –
जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम करन, बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जोश टंग, जॉन टर्नर, ल्यूक वुड.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ –
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.
(Ben Stokes officially comes out of ODI retirement.)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! विश्वचषकाच्या तोंडावर पाकिस्तानला धक्का, स्टार गोलंदाजाकडून अचानक निवृत्तीची घोषणा
Asia Cup 2023 । रवी शास्त्री, संदीप पाटील आणि एमएसके प्रसादांनी निवडला भारतीय संघ, वरिष्ठांकडे दुर्लक्ष