---Advertisement---

कर्णधार बनण्याच्या प्रश्नावर आले स्टोक्सचे उत्तर; म्हणाला, “या जबाबदारीसाठी मी…”

On: सोमवार, जानेवारी 3, 2022 4:07 PM
england gaba loss
---Advertisement---

जगातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी ऍशेस कसोटी मालिका (Ashes) ऑस्ट्रेलियामध्ये सुरू आहे. मालिकेत आत्तापर्यंत तीन सामने झाले असून, या सर्व सामन्यांमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. हे तिन्ही सामने गमावल्यामुळे इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट (Joe Root) व इंग्लंड संघावर सर्वजण टीका करत आहेत. अनेकांनी रूट याला कर्णधार पदावरून हटविण्याचा देखील सल्ला दिला आहे. त्याचवेळी बरेच माजी खेळाडू रूट याच्या जागी अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याला पुढील कसोटी कर्णधार म्हणून नियुक्त करावे असे म्हणत आहेत. आता या चर्चेवर स्वतः स्टोक्स याने पुढे येत प्रतिक्रिया दिली आहे. (England Test Captain)

काय म्हणाला स्टोक्स
ऑस्ट्रेलिया व इंग्लंडचे अनेक माजी क्रिकेटपटू इंग्लंड संघाने तिन्ही सामने गमावल्यानंतर रुटला कर्णधारपदावरून बाजूला होण्याचा सल्ला देत आहेत. या सर्वांनी इंग्लंडचा भविष्यातील कसोटी कर्णधार म्हणून अष्टपैलू बेन स्टोक्स याचे नाव घेतले आहे. त्याच वेळी आता स्वतः स्टोक्सने पुढे येत आपली बाजू मांडली. तो म्हणाला,
“यश-अपयश हे खेळात येतच असते. आम्ही मालिकेत पराभूत झालो असलो तरी, मला वाटते कि रूट आणि सिल्वरवूड (इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षक) हे आपले काम चोख करत आहेत. रूट असा कर्णधार आहे, ज्याच्यासाठी मला नेहमीच खेळायला आवडेल. सध्या माझा कर्णधार होण्याचा कोणताही मानस नाही.”

स्टोक्सने २०२० मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत इंग्लंड संघाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी इंग्लंड संघाला पराभूत व्हावे लागले होते. ऍशेस मालिकेतील पुढील सामना हा रूटसाठी महत्वपूर्ण असेल. या सामन्यात नेतृत्व करण्यासाठी उतरताच रूट इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा कर्णधार बनेल. यापूर्वी हा विक्रम ऍलिस्टर कुक याच्या नावे होता. त्याने ५९ कसोटी सामन्यात इंग्लंडचे नेतृत्व केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

अरेरे! दुखापतीमुळे विराटच्या हातून दवडली मोठी संधी, आता खास ‘शतका’साठी करावी लागणार प्रतिक्षा (mahasports.in)

कसोटीच्या नेतृत्त्वाची सूत्रे हाती घेत राहुलच्या शिरपेचात मानाचा तुरा, असा करणारा बनला चौथा कानडी क्रिकेटर (mahasports.in)

विराटने दुसऱ्या कसोटीतून माघार घेतल्यानंतर ट्वीटरवर आला प्रतिक्रियांचा पूर; चाहते म्हणतायेत… (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---