आयपीएलमध्ये शुक्रवारी (9 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला 46 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 184 धावा केल्या.प्रत्युत्तरादाखल राजस्थान संघाला केवळ 138 धावा करता आल्या. खराब कामगिरीमुळे आम्ही सामना गमावला अशी निराशाजनक प्रतिक्रिया राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने दिली.
सामन्यानंतर बोलताना स्मिथ म्हणाला, “आमच्या संघाने संपूर्ण 40 षटकांत उत्कृष्ट खेळ दाखवला नाही. खेळाडू योजना अंमलात आणण्यात अपयशी ठरले. अशा प्रकारे आम्ही कोणताही सामना जिंकू शकत नाही. गोलंदाजांनी चांगले काम केले, तथापि आम्ही 10-15 अतिरिक्त धावा दिल्या. मला वाटत नाही की खेळपट्टी पूर्वीसारखी चांगली होती, चेंडू थांबून येत होता.”
आतापर्यंत संघात खेळू न शकलेला इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स लवकरच आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे. ज्यामुळे राजस्थान संघ खूप आनंदित आहे.
“आम्हाला सकारात्मक राहिले पाहिजे, सामन्यात उत्कृष्ट खेळ दाखवण्याची गरज आहे. या क्षणी असे वाटत नाही की आमचा संघ चांगली कामगिरी करत आहे. मीसुद्धा चांगली फलंदाजी कारण्यात अपयशी ठरलो. या सामन्यात चांगली फलंदाजी करेल असे वाटले होते, पण मी खेळपट्टीवर जास्त काळ टिकू शकलो नाही. अष्टपैलू स्टोक्सने फारसा सराव केलेला नाही, तो उद्या क्वारंटाईनमधून मुक्त होईल, त्यामुळे तो पुढील सामन्यात खेळणार की नाही हे पाहावं लागेल.”
आयपीएलमध्ये शनिवारी (10 ऑक्टोबर) दोन सामने होणार आहेत. दिवसा किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने येतील तर सायंकाळच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ एकमेकांशी भिडणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रिषभ, अय्यर धावबाद झाले आणि दिल्लीने नोंदवला ‘हा’ नकोसा विक्रम
महिला आयपीएलचे सामने होणार युएईमधील ‘या’ शहरात?
IPL 2020 : आज पंजाब-कोलकाता आणि चेन्नई-बेंगलोर येणार आमने-सामने, जाणून घ्या सामन्यांबद्दल सर्वकाही
ट्रेंडिंग लेख –
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला