Loading...

हा खेळाडू म्हणतो, स्टोक्समुळे माझी रात्रीची झोप उडाली

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील चौथा कसोटी सामना आजपासून (4 सप्टेंबर) सुरु होणार आहे. हा सामना मँचेस्टरला होणार आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

स्टोक्सने तिसऱ्या ऍशेस सामन्यातील दुसऱ्या डावात नाबाद 135 धावा केल्या होत्या. तसेच शेवटच्या विकेटसाठी जॅक लीचबरोबर 76 धावांची भागीदारी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला होता.

स्टोक्सच्या या खेळीनंतर त्याला बाद कसे करावे याचा विचार करुन झोप उडाल्याचे पेनने म्हटले आहे.

‘माझ्या नेतृत्वाचा विचार करुन माझी झोप कधी उडाली नव्हती. पण स्टोक्सला बाद कसे करावे याचा विचार करुन माझी झोप उडाली.’

‘तो शानदार खेळाडू आहे आणि त्याच्यात सध्या आत्मविश्वास आहे. तो चांगला खेळत आहे. मी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याच्यासाठी योजना आखल्या आहेत. पण त्या चांगल्याप्रकारे राबवाव्या लागणार आहेत.’

Loading...

तसेच पेनने म्हटले आहे की नॅथन लायनची गोलंदाजी खेळताना स्टोक्सला संघर्ष करावा लागला आहे. त्याचबरोबर पेनने म्हटले आहे की लायनने स्टोक्सला बाद करण्याच्या संधी निर्माण केल्या होत्या. पण त्यावेळी क्षेत्ररक्षकांनी लायनला मदत केली पाहिजे. 

ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणाऱ्या चौथ्या ऍशेस सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरुवात होणार आहे.

Loading...

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

आजपासून सुरु होणाऱ्या चौथ्या ऍशेस कसोटीसाठी असा आहे इंग्लंडचा ११ जणांचा संघ

चौथ्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ; स्मिथचे झाले पुनरागमन

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना

You might also like
Loading...