Loading...

आजपासून सुरु होणाऱ्या चौथ्या ऍशेस कसोटीसाठी असा आहे इंग्लंडचा ११ जणांचा संघ

मँचेस्टर। आजपासून(4 सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथ्या ऍशेस कसोटीला ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर सुरुवात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरुवात होईल. या सामन्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी(3 सप्टेंबर) इंग्लंडच्या अंतिम 11 जणांच्या संघाची घोषणा केली आहे.

या सामन्यासाठी इंग्लंडने 11 जणांच्या संघात 1 बदल केला आहे. त्यांनी या 11 जणांच्या संघात वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स ऐवजी क्रेग ओव्हरटॉनला संधी दिली आहे. हा एक बदल वगळता तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळलेला संघच इंग्लंडने चौथ्या सामन्यासाठीही कायम केला आहे.

ओव्हरटन याआधी शेवटचा कसोटी सामना मार्च 2018 मध्ये खेळला आहे. त्यामुळे तो जवळ जवळ दिडवर्षांनी कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघात पुनरागमन करणार आहे.

याबरोबरच जो डेन्ली या सामन्यात रॉरी बर्न्सबरोबर सलामीला फलंदाजी करणार आहे. तर जेसन रॉय चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, असे इंग्लंडचा कर्णधार जो रुटने स्पष्ट केले आहे.

5 सामन्यांच्या या ऍशेस मालिकेत सध्या तीन सामन्यांनतर 1-1 अशी बरोबरी झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर तिसरा सामना इंग्लंडने जिंकला आहे. तसेच दुसरा सामना अनिर्णित राहिला होता.

Loading...

चौथ्या ऍशेस कसोटीसाठी असा आहे 11 जणांचा इंग्लंड संघ –

रोरी बर्न्स, जो डेन्ली, जो रूट (कर्णधार), जेसन रॉय, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), जोस बटलर, क्रेग ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच.

Loading...

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

चौथ्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ; स्मिथचे झाले पुनरागमन

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी घटना

मिताली राजने घेतला क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय

You might also like
Loading...