मिताली राजने घेतला क्रिकेटमधील सर्वात मोठा निर्णय

भारताची अनुभवी महिला फलंदाज मिताली राजने आज(3 सप्टेंबर) आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. मितालीने 2006 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण केले होते.

तिने आत्तापर्यंत 89 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले असून यात तिने 37.52 च्या सरासरीने 2364 धावा केल्या आहेत. यात तिच्या 17 अर्धशतकांचा समावेश आहे. तिने मागीलवर्षी मलेशिया विरुद्ध आशिया चषकात खेळताना तिच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील सर्वोत्तम वैयक्तिक धावांची खेळी केली होती. तिने या सामन्यात नाबाद 97 धावा केल्या होत्या.

त्याचबरोबर मिताली ही आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 2000 पेक्षा अधिक धावा करणारी पहिली आणि सध्या एकमेव भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. तसेच आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटपटूंमध्ये ती 6 व्या क्रमांकावर आहे.

तसेच मितालीने भारतीय महिला संघाचे 32 टी20 सामन्यात नेतृत्वही केले आहे. याबरोबरच तिने 2012, 2014 आणि 2016 या तीन आयसीसी महिला टी20 विश्वचषकात भारतीय महिला संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे.

मितालीने तिचा शेवटचा टी20 सामना इंग्लंड विरुद्ध यावर्षी मार्चमध्ये गुवाहाटी येथे खेळला.

मितालीने 2021 मध्ये न्यूझीलंडला होणाऱ्या महिला वनडे विश्वचषकावर लक्ष केंद्रित करण्यासाठी टी20 मधून निवृत्ती घेतली आहे. ती म्हणाली, ‘2006 पासून मी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत असून आता मी या क्रिकेटप्रकारातून निवृत्ती घेत आहे. ज्यामुळे मी 2021 वनडे विश्वचषकासाठी मी माझ्यावर लक्ष केंद्रित करु शकते.’

‘माझ्या देशासाठी विश्वचषक जिंकण्याचे माझे स्वप्न आहे आणि मला माझे सर्वोत्तम द्यायचे आहे. मी बीसीसीआयचे त्यांनी सातत्याने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानते. मी भारतीय टी20 संघाला शुभेच्छा देते.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

स्मिथ पुन्हा एकदा नंबर-१; कोहलीची कसोटी क्रमवारीत घसरण

कसोटी चॅम्पियनशीपमध्ये भारत अव्वल स्थानी; जाणून घ्या अन्य संघांचे किती आहेत गुण?

यष्टीरक्षणात रिषभ पंतची एक्सप्रेस सुसाट; केला हा मोठा पराक्रम

You might also like