---Advertisement---

अखेर न्यूझीलंडमध्ये जन्मलेला बेन स्टोक्स करणार इंग्लंडचे नेतृत्त्व

On: बुधवार, जुलै 1, 2020 12:25 PM
---Advertisement---

मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला 8 जुलैपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना साउथॅम्पटनच्या एजेस बाउल मैदानावर रंगणार आहे. या पहिल्या कसोटी सामन्यात अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सकडे इंग्लंड संघाची कमान सोपवण्यात आली आहे.

इंग्लंडचा नियमित कसोटी कर्णधार जो रुटने आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मावेळी पत्नीसोबत राहण्याचा निर्णय घेतला असल्याने तो पहिल्या कसोटीला मुकणार आहे. त्याच्या ऐवजी पहिल्या कसोटी सामन्यात स्टोक्स संघाचे नेतृत्व करेल, अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मंगळवारी दिली.

कोरोना व्हायरसमुळे तीन महिने एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना खेळला गेला नाही. या कसोटी मालिकेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयसीसीने नवे नियम लागू केले आहेत. या नव्या नियमानुसार ही कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात नेतृत्व करणारा बेन स्टोक्स म्हणाला की, “संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी माझ्याकडे आली असली तरी मी पूर्वीसारखा खेळत राहीन. गोलंदाजी आणि फलंदाजीतही चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. परिस्थिती अनुसार मी सकारात्मक खेळ करण्यावर भर देईन.”

माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू  फ्लिंटॉफ यांच्यानंतर संघाचे नेतृत्व सांभाळणारा बेन स्टोक्स हा पहिला अष्टपैलू खेळाडू आहे. 2017 साली त्याला संघाचा उपकर्णधार बनवले होते. मात्र, ब्रिस्टल येथे एका नाईट क्लबमध्ये झालेल्या मारामारीच्या प्रकरणानंतर त्याला आपले स्थान गमवावे लागले होते. पण या प्रकरणानंतर स्टोक्सने इंग्लंड संघात चांगले पुनरागमन करत पुन्हा आपले स्थान मिळवले. बेन स्टोक्स हा मूळचा न्यूझीलंडचा असून तो इंग्लंडकडून क्रिकेट खेळतो.

“इंग्लंड संघाचे नेतृत्व करणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत मी त्यांचा सल्ला जरुर घेईल. सर्वांकडून मार्गदर्शन सर्वांकडून सल्ला घेऊन मी चांगला निर्णय घेईल,” असे बेन स्टोक्स म्हणाला.

ट्रेंडिंग घडामोडी – 

दिग्गज कडाडला, आयपीएलने चायनीज प्रायोजकांशी नातं तोडलं पाहिजे; देश पहिला मग पैसा

हैद्राबादचे कर्णधारपद व न्यूझीलंडचे कर्णधारपद सांभाळण्यात काय आहे फरक? विलियमसन म्हणतो…

काल सुरु झालेली मोठी क्रिकेट लीग आज २ मॅचनंतर झाली रद्द, कारण आहे अतिशय वेगळे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---