---Advertisement---

इंग्लंडला बसला मोठा झटका; हा अष्टपैलू खेळाडू पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून पडला बाहेर

On: सोमवार, ऑगस्ट 10, 2020 10:51 AM
---Advertisement---

मुंबई । इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स पाकिस्तानविरुद्धच्या उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानला 3 गडी राखून पराभूत केले. उर्वरित दोन सामने अनुक्रमे 13 ऑगस्ट आणि 21 ऑगस्टपासून खेळले जातील. परंतु कौटुंबिक कारणांमुळे, स्टोक्स उर्वरित दोन्ही सामने खेळू शकणार नाही. आठवड्याच्या शेवटी स्टोक्स न्यूझीलंडला रवाना होईल. त्याचे कुटुंब न्यूझीलंडमध्ये राहते.

मागीलवर्षी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी स्टोक्सचे वडील गेड स्टोक्स यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनंतर ते नुकतेच तो घरी परत येत आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत आल्यानंतर स्टॉक्सचे वडील गंभीर आजारी पडले.

ख्रिस्टचर्चमध्ये जन्मलेला 29 वर्षीय स्टोक्स हा इंग्लंड संघाचा एक महत्त्वाचा सदस्य आहे. मागील वर्षी झालेल्या विश्वचषकात आणि त्यानंतर ऍशेस मालिकेत त्याने दमदार कामगिरी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला होता.

कोरोनाव्हायरसनंतर पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटी मालिकेत स्टोक्सची बॅट वेस्ट इंडिजविरूद्ध जोरदार चालली होती. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात स्टॉक्सने 176 आणि नाबाद 78 धावा केल्या. पण पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला चांगली फलंदाजी करता आली नाही. पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही तर दुसऱ्या डावात तो केवळ 9 धावा करू शकला. त्याने 11 धावा देऊन दोन बळीही घेतले.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराटच्या नेतृत्वात खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियन कर्णधाराची उत्सुकता शिगेला; म्हणतो, भारतीय प्रेक्षकांना…

दुखापतग्रस्त नसूनही वेस्ट इंडिजचा ‘हा’ खेळाडू सीपीएलमधून बाहेर; कारण जाणून दंग व्हाल…

वडील होते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, तरीही ‘हा’ खेळाडू उतरला मैदानावर आणि बनला मॅच विनर

ट्रेंडिंग लेख –

अशी ४ कारणं, ज्यामुळे राजस्थान आहे आयपीएलचा सर्वात प्रबळ दावेदार

एकही आयपीएल आरसीबी जिंकली नाही, पण आरसीबीचे असे ३ विक्रम मात्र मुंबईलाही जमले नाहीत

फिट नाहीत पण हिट आहेत, पोट वाढलेले क्रिकेट जगतातील ३ शिलेदार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---